Download App

पैलवान दीनानाथ सिंह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांनी घेतली खांद्यावर गदा

Dinanath Singh join NCP Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह (Hind Kesari And Maharashtra Kesari Dinanath Singh) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पैलवान चित्रपटातील ‘पैलवान गीत’ लाँच करण्यात आलंय. ‘महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती संस्कृतीचे दर्शन घडवणारे गाणे”पैलवान’मुळे महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

माझ्या ‘राजाराणी’ चित्रपटावर अन्याय होतोय; सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या, सुरजची चाहत्यांना भावनिक साद

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान श्री. दीनानाथ सिंह यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी मुंबईतील (Assembly Election) राष्ट्रवादीच्या कार्यालयात पैलवान चित्रपटातील ‘पैलवान गीत’ लाँच केले.

Bollywood News : कॉर्सेट साडीचा ट्रेंड सहजतेने कॅरी करणाऱ्या अभिनेत्री

प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलेले पैलवान गाणे ब्रह्मा आणि भूषण विश्वनाथ यांनी संगीतबद्ध केले असून, मनीष महाजन यांनी दिग्दर्शन केले आहे. अभिनेता अंकित मोहन हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. महाराष्ट्राच्या मातीशी आणि सांस्कृतिक वारशाशी असलेल्या या गाण्याचे अजित पवार यांनी कौतुक केले. महाराष्ट्राच्या पारंपारिक कुस्ती संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी हे गाणे समर्पित केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार देवेंद्र भुयार, आमदार किरण लहामटे, आमदार शिवाजी गर्जे, आमदार अमोल मिटकरी उपस्थित होते.

याप्रसंगी आबा काळे (मुंबई केसरी), सागर गरुड (उपमहाराष्ट्र केसरी), अमोल बराटे (हिंद केसरी), युवराज वहाग (दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी), सोनबा काळे (पुणे महापौर केसरी), अक्षय गरुड (युवा महाराष्ट्र केसरी), अक्षय हिरगुडे (हिंद केसरी, सुवर्णपदक विजेते) आणि ऋषिकेश भांडे (महाराष्ट्र चॅम्पियन) यांनीही पक्षात प्रवेश केला.

 

follow us