मुंबई : ‘ गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितलाय पण आधी सत्ता संघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. त्यानंतर गद्दार निवडणूक आयोगाकडे गेले. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये गद्दार अपात्र ठरणार असतील तर निवडणूक आयोग त्यांचा पक्षावरील दावा कसं काय गृहीत धरत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये अशी आमची मागणी आहे.’ अशी मागणी आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
‘गद्दरांनी शिवसेनेची घटना अमान्य केली आहे. पण त्यांनी शिवसेनेच्या घटनेप्रमाणेच विभागप्रमुख हे पद निर्माण केलं. मात्र शिवसेनेत हे पद फक्त प्रमुख शहरांसाठीच आहे. आम्ही निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता केली आहे. त्यामध्ये सदस्यसंख्या, शपथपत्र पण गद्दर म्हणत असतील की, निवडून आलेले सदस्य म्हणजेच पक्ष आहे. तर हा हास्यास्पद आहे.’
मग एवढे दिवस निवडणूक आयोगाने थांबण्याची गरजच नव्हती. तर पक्षांतर निवडणूक ही आम्ही लोकशाही मार्गाने घेतो. ते सर्व आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलाय. त्यामुळे कोंबडी आधी की, अंड आधी हा प्रश्न उभा राहतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी असं ‘सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये’ असं अवाहन यावेळी निवडणूक आयोगाला केलं आहे.