मुंबई : मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले. ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यासंदर्भातच हे दौरे आहेत हे दिसतय. ते राज्याला काही देणार असतील तर त्याला विरोध करण्याचं काही काम नाही. पण ते इथं येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विषय त्यांनीच पाहावा. फडणवीसांनी मोदींच्या मुंबईत येण्याबद्दल जरून आनंद व्यक्त कारावा.’ असही पवार म्हणाले.
‘त्यांच्या पक्षात त्यांनी काय कारायचं हा त्यांचा अधिकार आहे. पण आम्हाला हे ठाऊक आहे की अनिल देशमुख एक वर्षापेक्षा जास्त दिवस जेलमध्ये होते. त्यानंतर जे जजमेंट आले त्यात ते पास झाले. सामनाचे संपादक राऊत हे ही जेलमध्ये होते. त्यासंबंधी कोर्टाची जी ऑर्डर आली आहे. त्यामध्ये मनी लॉन्ड्रींगशी त्यांचा काही संबंध नव्हता अशा आशयाचं काही तरी लिहीलं आहे.’
Sharad Pawar : अनिल देशमुखांना विनाकारण तुरूंगात डांबलं
‘या एक एक गोष्टी काय सांगतायेत ? नवाब मलिक आजही जेलमध्ये आहेत. त्यामुळे या राज्यपातळीवर काम करणाऱ्या नेत्यांच्या संबंधी या राज्यसरकारची काय भूमिका आहे ? हे पाहिल्यानंतर इतरांसंदर्भात काय बोलाव याचा फेरविचार त्यांनीच करावा.’ भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुरूंगात टाकण्याचं काम सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही प्रतिक्रिया दिली.