If there is a job, give it to Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना हे कायम सातत्यचाने भाजपसह केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) निशाणा साधत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यतमातून 71 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले. रोजगार मेळाव्या अंतर्गत सरकारी विभागात नुकत्याचं नियुक्त झालेल्या तरुणांना हे नियुक्ती पत्र दिले गेले. दरम्यान, य़ावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद मोदींना (Narend Modi) टोला लगावला. अशा प्रकारे नियुक्तीपत्र वाटण्याचं काम आमच्याकडे नगरसेवक आणि शाखाप्रमुख करतात, असं राऊत म्हणाले होते. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. किती शिवसैनिकांना नोकऱ्या मिळवून दिल्या हे राऊतांना सांगावं, असं आव्हान राणेंनी केलं.
मोदींवर टीका करतांना राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रात नगरसेवक आणि शाखाप्रमुखांच्या स्थरावर रोजगार मेळावे आयोजित केले जात असतात. आणि त्यांना नियुक्तीपत्र वाटण्याचं काम देखील हे नगरसेवक आणि शाखाप्रमुखाद्वारे केलं जायचं. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच ही भूमीपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी केली होती. मात्र, त्यांनी कधी अशी पत्रक वाटली नाहीत, पंतप्रधान मोदी हे नियुक्तीपत्र वाटून राजकारण करत आहेत, असं राऊत म्हणाले होते. राऊतांच्या याच टीकेला राणेंनी पलटवार केला. एखादी नोकरी संजय राऊतांना द्या, अशी खिल्ली राणेंनी उडविली. तुमच्याकडे शाखाप्रमुखपद असेल तर एखादी नोकरी ही संजय राऊतांना द्या. ते राज्यसभेचे खासदार आहेत. अशा प्रकारे पंतप्रधानांवर टीका टीप्पणी करणं, हे राऊतांना शोभत नाही. आजवर किती शिवसैनिकांना नोकऱ्या मिळवून दिल्या, हे राऊतांनी सांगाव, असं आव्हान राणेंनी दिलं.
Asad Ahemad : १० हजार चकमकी अन् १७२ हून अधिक एन्काउंटर; योगी सरकारचा असाही ‘रेकॉर्ड’
काल अंजली दमानिया यांनी राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून दिली. 15-16 आमदार बाद होणार असून अजित पवारही भाजपसोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय, ते भाजपच्या संपर्कात असल्याचंही बोलल्या जातं. त्यामुळं अजित पवार भाजपात येतील का, असं नारायणे राणेंना विचारलं असता राणेंनी सांगितले की,
अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. भाजपसोबत असण्याचा काही प्रश्नच नाही. जॉईन मिटींग होत असतात. त्यामुळं कधी काळी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येतात. मी तुम्हा पत्रकारांशी बोलतोय, तुमच्याशी गप्पा मारत आहे, याचा अर्थ तुम्ही काही भाजपसोबत नाही नाही ना, असा सवाल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे हे अनेकदा सिल्वर ओकेवर गेले. मात्र, पूर्वी मातोश्रीवर अन्य पक्षाचे नेते यायचे. बाळासाहेब ठाकरे हे कधी सोनिया गांधींच्या दारी गेले नाहीत. पण, आता मातोश्रीचे वारस हे सिल्वर ओकवर जात असतात. पूर्वीसारखं आता मातोश्रीचं पावित्र्य राहिलं नाही, असं राणे म्हणाले.
एकनाथ शिंदे हे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने मातोश्रीवर येऊन रडले होते, आणि भाजपसोबत गेलो नाही, तर मला अटक होईल, असा दावा केला होता. यावर पत्रकारांनी नारायण राणेंना विचारलं असतं राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. कोण आदित्य ठाकरे? त्याचा प्रतिष्ठा काय, आदित्य ठाकरे हा बालीश आहे. तुम्ही आता शाळेतल्या मुलांवरही प्रश्न विचारणार का, असा सवाल करत आदित्य ठाकरेंवर तोंडसुख घेतलं.