Uddhav Thackeray Interview : संजय राऊत यांनी शिवसेना (उबाठा) यांनी सामनासाठी मुलाखत घेतली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवरही जोरदार प्रहार केले. यावेळी राऊत यांनी शिवसेना फोडल्याचा विषय काढत त्यावरही काही प्रश्न ठाकरे यांना यामध्ये विचारले.
तर मी नाव का घेऊ
माझ्या शिवसेनेला यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आहे. परंतु, त्यांना हे नाव घ्यायला लाज वाटते. त्यामुळे त्यांनी माझ्या पूर्ण नावाचा शॉर्ट फॉम केला आहे. जर त्यांच्या शिवसेनेच नाव घ्यायचं असेल तर ते “एसंशिं” असं घ्यावं लागेलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्यावर टीका केली. तसंच, त्यांना माझ्या वडिलांच पूर्ण नाव घेण्याची लाज वाटत असेल तर मी का घेऊ असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
गद्दारीचा शिक्का कसा पुसणार
तसंच, यावर पुढे बोलतना ठाकरे म्हणाले, तुम्ही गद्दारी करून राजकारणातील आईशी हरामखोरपणा केला. महाराष्ट्राशी गद्दारी केली. ही गद्दारी महाराष्ट्रात चालणार नाही असं त्यांनी सांगितले. तसंच, आज छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन साडेतीनशे वर्ष होऊन गेली. पण खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांच्या डोक्यावरील गद्दारीचा शिक्का अजूनही पुसला गेलेला नाही असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
दोन वेळा मुर्ख बनवलं
मोदी सरकारच्या थापा उघड झाल्या आहेत. हे गजनी सरकार आहे. 2014 साली ते बोलले, ते 2019 ला आठवत नाही, 2019 ला जे बोलले ते आता आठवत नाही. जनतेच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला नाही. जनता 2 वेळा मुर्ख बनली आहे आता जनता पेटली आहे. अनेक भूलथापा यांनी दिल्या, भ्रष्टाचारांना घेतायेत, पक्ष फोडले, महाराष्ट्राने गद्दारी कधीच सहन केली नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.