‘PM पदासाठी मोदींना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती’; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

‘PM पदासाठी मोदींना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती’; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Thane Lok Sabha Election : राज्यात चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा काल सायंकाळी थंडावल्या. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि स्टार प्रचारकांनी जोरदार प्रचार केला. काल ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला. पंतप्रधान मोदींना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती, असा आरोप त्यांनी या सभेत केला. नरेंद्र मोदी फॅसिस्ट विचारांचे आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडी भ्रष्टाचारीच, अमित शाहांनी १० वर्षांचा हिशोबच दिला

केतकर पुढे म्हणााले, ही निवडणूक राजन विरुद्ध नरेश म्हस्के अशी नाही तर राजन विचारे विरुद्ध फॅसिझम अशी आहे. या फॅसिस्ट प्रवृत्तीच्या लोकांनी २०१४ पासून देशाची सत्ता काबीज केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह त्यांचे प्रतिनिधी आहेत. पंतप्रधान पदासाठी मोदींचं नाव पुढे येण्याआधी लालकृष्ण अडवाणी यांचं नाव चर्चेत असायचं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की लालकृष्ण अडवाणी नसतील तर आमचा पाठिंबा सुषमा स्वराज यांना राहिल.

या गोष्टी लक्षात आल्यानंतर मोदींनी ठाकरेंना धडा शिकवायचा हे ठरवलं होतं. यासाठी मग त्यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. खरंतर त्यांना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती. पण, २०१९ मध्ये त्यांनी हे करून दाखवलं. या गोष्टी सामान्य लोकांच्या लक्षात येण्यास उशीर झाला, अशी टीका काँग्रेस नेते कुमार केतकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

Lok Sabha Election: शरद पवारांचं दुकान बंद पडू लागलंय, त्यामुळेच…, देवेंद्र फडणवीस यांची कठोर टीका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube