Download App

Maharashtra Politics : हर्षवर्धन पाटील हे दत्तात्रय भरणेंना घाबरले का?

Harshwardhan Patil Vs Dattatray Bharane :  राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली आहे.  काल या निवडणुकीत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ग्रामीण भागातील एक महत्वाची निवडणूक म्हणून याकडे पाहिले जाते. अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्या आहेत. पण पुणे जिल्ह्यातील इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा पवित्रा घेतला. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याची आमची इच्छा होती. पण आमच्याशी कोणीही संपर्क केला नाही, असे पाटील म्हणाले. बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. त्यामुळे येथील निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव पाटील यांनी शेतकरी हिताचा विचार करुन ही संस्था चालवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार नसल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.

Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…

दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणूक अत्यंत आक्रमकपणे लढवत असतो. अगदी महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचे राष्ट्रीय नेते हे प्रचारासाठी येत असतात. पण पुणे जिल्ह्यामध्ये महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पाटील यांनी माघार घेतल्याने ते राष्ट्रावादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांना घाबरले आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याआधी 2014 व 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.

नेवासा बाजार समिती निवडणुकीने लक्ष वेधलं, गडाख-घुलेंविरोधात मुरकुटेंनी दंड थोपटले

2019 सालच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वीच इंदापूर येथे राष्ट्रवादीने आपल्या फ्लेक्सवर भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांचा फोटो लावल्याने हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. पण आता बाजार समितीच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते आमने-सामने येणार असे चित्र असताना हर्षवर्धन पाटील यांनी ऐनवेळी कच खाल्ली आहे. यावरुन 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीआधी अपशकून होऊ नये म्हणून त्यांनी या बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Tags

follow us