नेवासा बाजार समिती निवडणुकीने लक्ष वेधलं, गडाख-घुलेंविरोधात मुरकुटेंनी दंड थोपटले

नेवासा बाजार समिती निवडणुकीने लक्ष वेधलं, गडाख-घुलेंविरोधात मुरकुटेंनी दंड थोपटले

अहमदनगर : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. कारण गडाख-घुले यांच्याविरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दंड थोपटले आहेत. बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 117 अर्ज दाखल झाले आहेत. बिनविरोध होणाऱ्या या निवडणूकीत अचानक अखेरीस विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक लादल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

उद्धव ठाकरेंना कायमच घरकोंबडा बनावं लागेल; बावनकुळेंनी धमकावलं

आमदार शंकरराव गडाख आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले समर्थकांविरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंच्या समर्थकांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत गडाख-घुले विरुध्द बाळासाहेब मुरकुटे असा सामना रंगणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत गडाख, घुले, मुरकुटेंचे समर्थक उतरल्याने सर्वांच लक्ष वेधलं आहे.

मंत्रालयासमोर विषप्राशन करणाऱ्या संगीता डवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

घुले-गडाखांविरोधात मुरकुटे गटाचे माजी संचालक देविदास साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर लोखंडे, अरुण देशमुख, अशोकराव कोळेकर, भारत गुंजाळ यांच्या पत्नींसह, सुनिल वाघ, भगवान गंगावणे यांच्यासह इतर मिञ पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.

निवडणूक बिनविरोधक होणार, असे राजकीय समीकरण असतांना अचानक शेवटच्या टप्प्यात विरोधकांनी एकञ येत अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक लादली गेल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झालेली असून शंकर गडाख, चंद्रशेखर घुले यांच्याविरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे कशी लढत देणार? याकडे राजकीय निरीक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत.

दरम्यान, निवडणुकीचा बिगुल वाजविला असला तरी गडाख-घुलेंच्या ताकदीपुढे विरोधकांचा कस लागणार का? शेवटच्या टप्प्यात दाखल केलेले उमेदवारी अर्ज राहणार की, माघारी घेणार? याकडे समाजमनाचे लक्ष लागून राहिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube