मंत्रालयासमोर विषप्राशन करणाऱ्या संगीता डवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

मंत्रालयासमोर विषप्राशन करणाऱ्या संगीता डवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस पत्नी संगीता डवरे (Sangeeta Daware) यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital)उपचार सुरू होते. संगीता यांचे पती पोलील दलात कार्यरत होते. त्यावेळी त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर नीट उपचार केले नव्हते. त्यामुळं संबंधित डॉक्टरांवर योग्य कारवाई व्हावी, अशी तक्रार संगीता यांनी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीत यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असतांना त्यांचा अपघात झाला होता. पामबीच मार्गावर लावलेल्या नाकाबंदीच्या वेळी भरघाव इनोव्हा कारने थेट बॅरिगेट्स तोडले होते. याच भरघाव गाडीखाली संगीता यांच्या पतीचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्या पतीवर योग्य उपचार केले नाहीत. त्यामुळं त्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी होती.

तरंच गृहमंत्र्यामध्ये दम असल्याचं समजू, जयंत पाटलांचं फडणीसांना खुलं आव्हान 

शिवाय, कार चालक हा मद्यप्राशन करून होता. त्यामुळं त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, त्याच्यावर कोणतीही कावाई झाली नाही. संगीत यांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं. कारचालकाला सजा व्हावी म्हणून त्यांनी अनेकांचे उंबरे झिजवले होते. मात्र, पती काम करत असलेल्या पोलीस विभागाकडूनच आपल्याला न्याय मिळत नाही, हे पाहून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. इशारा देऊनही सरकार गांभीर्य दाखवत नसल्याने त्यांनी मंत्रालयासमोर विषप्राशन केलं होतं.

त्या 27 मार्च रोजी मंत्रालयात पोहोचल्या होत्या. सरकार दरबारी खेटे घालूनही पदरी निराशाच आल्यानं त्यांनी मंत्रालयात विषप्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज उपचारा दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. पोलिसाच्या पत्नीलाच न्याय मिळाला नसल्यान अनेक स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube