उद्धव ठाकरेंना कायमचं घरकोंबडा बनावं लागेल; बावनकुळेंनी धमकावलं

उद्धव ठाकरेंना कायमचं घरकोंबडा बनावं लागेल; बावनकुळेंनी धमकावलं

नागपूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)निशाणा साधला त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील व्यक्तमत्व आहेत. मुख्यमंत्री असताना, विरोधीपक्षनेते असताना त्याचबरोबर आता उपमुख्यमंत्री असताना त्यांचा संवेदनशीलपणा राज्यातील 13 कोटी लोकांनी अनुभवला आहे. अशा व्यक्तीमत्वाबद्दल उद्धव ठाकरेंसारखा घरकोंबडा देवेंद्र फडणवीसांवर टीका करतो, उद्धव ठाकरेंना भाजपच्या नेत्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही, आज उद्धव ठाकरेंना शेवटची संधी, यापुढे त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केल्यास आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.

Rajan Patil यांनी यंदाही आपला गड राखला; मोहोळ बाजार समिती बिनविरोध

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शुन्य कर्तुत्व असलेल्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तुत्व असलेल्या देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलणं म्हणजे खरतर सूर्याला दिवा दाखवण्यासारखं असल्याची टीका यावेळी उद्धव ठाकरेंवर केली आहे. उद्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी देखील उद्धव ठाकरेंना सोडेल, अशी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीचं जमत नाही, पण पर्याय नसल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंचं कर्तुत्व कोणीच मान्य करु शकत नाही. ते सत्तेसाठी एकत्र आले होते. त्यामुळे, आज धनुष्यबाण गेला, शिवसेना गेली तरी सुधारत नाही अशी टीका केली आहे.

वाझे प्रकरणावरुनही बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे वाझेंसारखा माणूस जेलमध्ये गेला होता आणि त्याची लाळ उद्धव ठाकरे चाटत होते. अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार करुन घेतला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर त्यांची भीती वाटत होती.

आपल्यातील किती जणांची चौकशी लावतील आणि त्यातून किती जणांचं घबाड बाहेर निघेल याची भिती त्यांना आहे, अशी ठाकरेंना आहे. पण तसा फडणवीसांचा स्वभाव नाही. फडणवीसांनी तसं वागायला सुरुवात केली तर उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रात राहणं मुश्कील होऊन जाईल अशी जहरी टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube