India Alliance Delhi Rally: राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीकडून ‘वोट बचाव, देश बचाव’ या घोषणेसह महारॅली काढण्यात येत आहे. मिंटो रोड येथून सुरू झालेला हा मोर्चा रामलीला मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
या मोर्चात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे प्रमुख नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पश्चिम बंगालच्या नेत्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह महाराष्ट्रातून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनीही या मोर्चात सहभाग घेतला आहे.
‘मोदीजींचा बाप काढणाऱ्यांना महाराष्ट्र खड्ड्यात गाडेल’; एकनाथ शिंदेंचा इंडिया आघाडीला इशारा
इंडिया आघाडीचा हा मोर्चा रामलीला मैदानात पोहोचण्यापूर्वीच मैदानावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. त्यामुळे परिसरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मोर्चाला सायंकाळी 5 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीनेही या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. SIR प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून विरोधकांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आपली भूमिका या महारॅलीच्या माध्यमातून मांडली आहे.
