महाराष्ट्रात इंडिया आघाडीच बाजी मारणार! 48 पैकी 26 जागा जिंकणार, मूड ऑफ नेशनचा सर्व्हे

Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. मात्र, काही सर्व्हेमध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज ‘इंडिया टुडे मूड ऑफ नेशन’चा सर्व्हे […]

महाराष्ट्रात इंडिया आघाडीच बाजी मारणार! 48 पैकी 26 जागा जिंकणार, मूड ऑफ नेशनचा सर्व्हे

Lok Sabha Elections 2024 (2)

Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. मात्र, काही सर्व्हेमध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज ‘इंडिया टुडे मूड ऑफ नेशन’चा सर्व्हे समोर आला. महायुतीपेक्षा इंडिया आघाडीला (India Alliance) जास्त जागा मिळतील, असं या सर्व्हेतून समोर आले आहे. तर महाराष्ट्रातील 48 पैकी 26 जागा इंडिया आघाडी मुसंडी मारले, असं या सर्व्हेत सांगण्यात आलं.

बाबा सिद्दीकी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही; विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका 

राज्यात इंडिया आघाडीला 26 जागा
इंडिया टुडेचा ‘द मूड ऑफ द नेशन फेब्रुवारी 2024’ हा सर्व्हे सर्व लोकसभेतील 35,801 प्रतिसादकर्त्यांच्या आधारावर बेतलेला आहे. हे सर्वेक्षण 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात आले. राज्यात इंडिया अलायन्सला 26 तर भाजप आणि एनडीए आघाडीला 22 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळं राज्यात महायुतीकडून अब की बार ४५ पार असा नारा दिला जात असला तरी महायुतीसाठी सध्या राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे.

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; विनोद घोसाळकरांच्या मुलावर हल्ला 

महाराष्ट्रात काँग्रेसला 12 जागा
इंडिया आघाडीतील घटक पक्षांची कामगिरी पाहता काँग्रेस पक्षाला चांगला पाठिंबा मिळत असल्याचा दावा सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला 12 जागा मिळतील, असा अंदाज सर्व्हेत वर्तवला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली होती. 2014 मध्ये काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते. तर 2019 मध्ये बाळू धानोरकर यांच्या रूपाने काँग्रेसला एकच जागा मिळाली होती.

तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) 14 जागा मिळतात. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) यांना 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र येऊन भाजपला विशेष फायदा होताना दिसत नाही. भाजप महायुतीला 40.5 टक्के, काँग्रेसच्या महाविकास आघाडीला 44.5 टक्के तर इतरांना 15 टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे टाइम्स नाऊ मॅट्रीजचाही सर्व्हे आता समोर आला. यात एनडीएला 39 तर इंडिया अलायन्सला फक्त 9 जागा मिळतील असा अंदाज आहे.

Exit mobile version