ठाकरेंनी सोडली ‘साथ’ तर संकटात येईल आघाडीचा ‘हात’; ‘बिहार’नंतर महाराष्ट्रात कशाची चर्चा?

ठाकरेंनी सोडली ‘साथ’ तर संकटात येईल आघाडीचा ‘हात’; ‘बिहार’नंतर महाराष्ट्रात कशाची चर्चा?

Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) कोकण दौऱ्यातील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. आता विरोधी पक्षात असताना त्यांचे मोदी आणि भाजपाप्रती बदललेले सूर देशात आणि राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. यामुळे इंडिया आघाडीत (INDIA Alliance) सुद्धा संशयाचे वातावरण तयार झाले आहे तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी दबक्या आवाजात राजकारणात कधीच दरवाजे बंद होत नसतात असे म्हणण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या आघाडीच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बिहार (Bihar) आणि महाराष्ट्र या (Maharashtra) दोन राज्यातील राजकारणात वेगाने बदल होत आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी (Nitish Kumar) आघाडीची साथ सोडत जोरदार झटका दिला आहेच आता तशीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यातील जाहीर सभेत सांगितले की मी मोदींना सांगू इच्छितो की आम्ही कधीच तुमचे शत्रू नव्हतो, आजही नाही. आम्ही मागील वेळी तुमचा प्रचारही केला होता. नंतर तुम्ही पंतप्रधान झालात आणि आम्हाला बाजूला केलं. आमचं हिंदुत्व आणि भगवा ध्वज आजही कायम आहे.

“निवडणूक आयोग म्हणजे तडजोड बहाद्दर!” पक्ष अन् चिन्हाच्या निर्णयावर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

ठाकरेंचीही होऊ शकते अडचण 

उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य अशा वेळी आले आहे ज्यावेळी इंडिया आघाडी फुटीमुळे बॅकफूटवर आहे तर भाजप मात्र जुन्या नव्या मित्रांना जोडण्याच्या मोहिमेवर काम करत आहे. महाराष्ट्रात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून यातील दोन गटांना आपल्यासोबत घेतले आहे. दोन्ही गटांतील बहुतांश नेते आता भाजपबरोबर आहेत. अशा परिस्थितीत विरोधी आघाडी जास्तच कमकुवत झाली आहे. उद्धव ठाकरे निवडणूक आयोग (Election Commission) आणि न्यायालयात पक्ष चिन्ह आणि नावाची लढाई हरले आहेत. अशा वेळी काँग्रेस आणि शरद पवार गटाबरोबर एकत्रित निवडणुका लढल्यास ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बाळासाहेबांचे वारसदार म्हणून उद्धव ठाकरे

ठाकरे गट पुन्हा सोबत आल्यास भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण आजही जनता उद्धव ठाकरे यांनाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार मानते. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांच्या मनसेलाही जनतेने स्वीकार केले नाही मग अशा वेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला जनता कशी स्वीकारणार हा सुद्धा प्रश्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद अजित पवार यांच्या रूपाने आधीच भाजपबरोबर आहे अशात जर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीत वापसी केली तर मग महाराष्ट्रात इंडिया आघाडीला काहीच अर्थ राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या एका प्रमुख नेत्याने सांगितले की राजकारणात काहीच अशक्य नाही आणि येथे दरवाजे कधीच बंद होत नसतात.

पक्ष अन् चिन्ह बळकावलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबतच…रोहित पवारांची तिखट टीका

ठाकरेंनी साथ सोडली तर काँग्रेसलाच फटका 

जर निवडणुकीआधी हे समीकरण जुळून आले तर याचा सर्वाधिक फटका काँग्रेसलाच बसणार आहे. आघाडीत सध्या काँग्रेस पक्ष एकटा पडत चालल्याचे दिसून येत आहे. ज्या पक्ष आणि नेत्यांवर त्यांना सर्वाधिक विश्वास होता त्यांनीच काँग्रेसची साथ सोडली आहे दुसरीकडे भाजपाचे असे प्रयत्न आहेत की काँग्रेसला जास्तीत जास्त एकटे पाडणे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत 400+ जागांचे उद्दिष्ट साध्य करणे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज