पक्ष अन् चिन्ह बळकावलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबतच…रोहित पवारांची तिखट टीका
NCP party and symbol :राजकारणातील अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली घडली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांचे असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.
केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करून फुटीर गट व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बळकवण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो, आज सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावला असलं तरी पक्षाचा बाप आमच्या सोबतच आहे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीमध्येमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट तयार झाले होते. दरम्यान राष्ट्रवादीचे चिन्ह व पक्षाचे नाव हे कोणाच्या बाजूने जाणार याकडे राज्याचे लक्ष लागून होते. याचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.
दिल्लीमधून सूत्र हलली, ठरलेला निकाल आला; शरद पवार गटाचा हल्लाबोल
पक्ष व चिन्ह गेले मात्र बाप…
केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते…. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! लडेंगे_और_जितेंगे! असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
तीन महिन्यांपूर्वीच तयारी; शरद पवारांच्या पक्षाला मिळणार हे ‘नाव’ अन् ‘चिन्ह’
लोकशाहीची क्रूर थट्टा चालू
राष्ट्रवादीच्या पक्ष व चिन्हाबाबत झालेल्या निर्णयांनंतर आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, 2 जुलै रोजी माझ्या काही सहकारी आमदारांनी भाजप बरोबर जाण्याची भुमिका घेतली. ही जर पक्षाची भुमिका होती, तर माझ्यासारख्या आमदाराला याची यत्किंचितही कल्पना नव्हती. मी माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रांताध्यक्ष यांच्या भुमिकेबरोबर राहिलो. आणि आज बातमी कानावर येते की पक्षाचे नाव आणि चिन्ह समोरच्या गटाला मिळालंय. आम्ही आजही पवार साहेबांच्या विचारावर ठाम आहोत. निवडणूक आयोगाने काहीही निर्णय दिला असला तरी जनतेच्या न्यायालयात शरद पवार साहेबांच्याच विचाराचा विजय होणार याची आम्हाला खात्री आहे असे तनपुरे म्हणाले आहे.
मोठी बातमी! अजित पवार गटाला ‘पक्ष’ आणि ‘चिन्ह’ मिळालं, निवडणूक आयोगाचा निर्णय