India C Voter Survey For Loksabha NDA Or India Alliance : मागील वर्षी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत एनडीएचा दणक्यात विजय झालाय. केंद्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन (India C Voter Survey) झालं. परंतु आता पुन्हा जर लोकसभा निवडणुका झाल्या, तर जनतेचा कौल कोणाला राहील? हा प्रश्न सर्वांना पडतोय. पुन्हा एनडीएचालाच मतदारांची पसंती असणार की (NDA Or India Alliance) बदलणार, या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण करण्यात आलं.
पाकिस्तानची धडकी भरवणारी कामगिरी; 352 धावांचे आव्हान पार करत आफ्रिकेचा पराभव
गेल्या वर्षी 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीए युतीने विजय मिळवला होता, परंतु जर आज सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर कोणत्या युतीला सर्वाधिक मते मिळतील? कोणाचे सरकार स्थापन होईल, यावर एक सर्वेक्षण करण्यात आलं. देशात कोणी सरकार स्थापन करावं, यावर सर्वेक्षणात जनतेने आपलं मत दिलंय. यावेळी अतिशय धक्कादायक निकाल समोर आलाय.
देशात दोन प्रमुख आघाड्या आहेत. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि दुसरी म्हणजे इंडिया अलायन्स. इंडिया टुडेने सी व्होटरच्या सहकार्याने मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण केलंय. यामध्ये असं दिसून आलंय की, जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीए, इंडिया आघाडी आणि इतर पक्षांमध्ये जनतेची कोणाली सर्वात जास्त पसंती आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार? ‘त्या’ चर्चांना CM फडणवीसांचा फुलस्टॉप!
या सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 46.9 टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वेक्षणात इंडिया आघाडीला 40.06 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. इतरांना 12.5 टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. एकट्या एनडीएला मोठी आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकते. तर काँग्रेस पक्षाची अवस्था वाईट असल्याचं समोर आलंय.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 240 जागा जिंकल्या होत्या. तर कॉंग्रेसला केवळ 19 जागांवर यश मिळालंय. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत पंतप्रधानपदी विराजमान झालेत. तर इंडिया सी व्होटरच्या सर्व्हेत भाजपला पुन्हा एकदा जनतेची पसंती मिळताना दिसत आहे.