Lok Sabha elections : प्रकाश आंबेडकरच्या‘वंचित’ला मतदारांनी का नाकारले?
Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) येणार की नाही, यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली होती. मात्र, अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वंचितने बहुतांश मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बाजी मारली नाही. आणि यावेळेस अॅड. प्रकाश आंबेडकरांना मतदारांनी नाकारले.
लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो; मला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी करणार
‘वंचित’ने 35 उमेदवार उभे केले, शिवाय, कोल्हापूर, नागपूर, बारामती आणि सांगलीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नीलेश सांबरे आणि स्वत: आंबेडकर वगळता वंचितच्या एकाही उमेदवाराला दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळाले नाहीत. यावरून असे दिसून आले की यावेळेस ‘वंचित’ला मतदारांनी नाकारलं आहे.
महाराष्ट्रात पुन्हा कमबॅक करण्यासाठी सरकारमधून मोकळं करा – देवेंद्र फडणवीस
‘संविधान आणि लोकशाही बचाव’ या मुद्द्यावर निवडणुकीत मतांची फूट टाळण्यासाठी जनतेने थेट महाविकास आघाडीला मतदान करणे पसंत केले. मुंबईत नोटाला पडलेल्या मतांपेक्षा कमी मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळाली. महाविकास आघाडीबरोबर फारकत घेतल्यावर मुंबईत वंचित बहुजन आघाडीने सर्वच्या सर्व सहा जांगावर आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये तीन मुस्लिम उमेदवार पक्षाने दिले होते. तर तीन ठिकाणी दलित आणि बहुजन समाजातील उमेदवार उभे केले होते. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई मतदारसंघांचा अपवाद वगळता उर्वरित मतदारसंघात नोटापेक्षा कमी मतांवरच ‘वंचित’ला नाकारले. या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना एकूण 70 हजारांच्या आसपास मते मिळाली आहे.
2019 मध्ये देखील वंचितला फक्त 7 टक्के मते मिळाली होती. नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, अकोला या जागांवर लाखांहून अधिक मते होती. यामुळेच या जागांवरील काँग्रेसचे उमेदवार पराभूत करण्यात यश मिळाले होते. मात्र, वंचितचा हा मत टक्का नंतरच्या विधानसभा आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत एकत्रित पाहायला मिळाला नाही. त्यांनी मविआसोबत न जाता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय का घेतला, हे न उलगडलेले कोडे आहे. वंचितच्या उमेदवारामुळे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि विशेषतः आंबेडकरी मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपलाच होण्याची झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, परिवर्तनवादी मतदारांनी ‘वंचित’ च्या मागे न जाता मविआला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात अनोखं चित्र पाहायला मिळाले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकरांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावणारा हा निकाल आहे.