Download App

चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही; पटेलांची राऊतांवर जहरी टीका

चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नसल्याची जहरी टीका राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊतांवर केलीयं.

Prafulla Patel On Sanjay Raut : चिल्लर राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नसल्याची जहरी टीका राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केलीयं. दरम्यान, भारत पाकिस्तान युद्धाच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी सत्ताधार्यांवर सडकून टीका केली . त्यावर बोलताना पटेल यांनी टीका केलीयं.

“पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं घोर उल्लंघन; कठोर कारवाई करा”, केंद्र सरकारचे निर्देश

प्रफुल्ल पटेल म्हणाले, भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपण कितपत नोंद घ्यावी, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्यांना स्वतःला काही माहित नाही. आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे. देशाच भल कश्यामध्ये आहे, त्यांना माहीत नसेल अशा चिल्लर लोकांना बदल आणि चिल्लर राजकारण करणाऱ्या बदल उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, अशी टीका प्रफुल पटेल यांनी संजय राऊतांवर केलीयं. आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प कोणत्या अधिकाराने ही मध्यस्थी करत आहेत? असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला होता.

Video : सियालकोटसह पाकचे 7 एअरबेस उद्ध्वस्त; भारताचं S 400 अन् ब्रह्मोस सेफ : सोफिया कुरेशी

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या दिवसापासून राष्ट्रवादी वेगळी झाली त्या दिवसांपासून अनेक वेळा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होती. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावरून सुप्रिया सुळे हे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशा चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना विचारले असता. “असे महत्त्वाचे निर्णय हे प्रेस समोर घ्यायचे नसतात” अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलीयं.

पाकिस्तानकडे गमावण्यासाठी काही नाही. आपल्याकडे खूप काही आहे. त्याच्यामुळे सिजफायर केलं. अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत पाकिस्तान युद्धविराम जाहीर करण्यात आलं. पाकिस्तानचे सर्व हल्ले भारतीय सेनेने परतावून लावले. भारताची भूमिका स्पष्ट आहे आमची लढाई ही पाकिस्तानच्या सर्व सामान्य नागरिकांशी नसून आतंकवाद्यांच्या विरोधात आहे. पहलकांमध्ये केलेला अटॅक हा अतिशय घृणास्पद आहे. 1971 च्या नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचे आत जाऊन आतंकवादचे नऊ ठिकाण उध्वस्त केले आहे. भारत एक जबाबदार राष्ट्र असून आपल्याकडे गमवायसाठी खूप काही आहे मात्र पाकिस्तानकडे गमवण्यासाठी काही नाही. तो एक फेल देश आहे. भारताने पहिल्या दिवसापासून संयमी भूमिका घेतली असून आतंकवादाच्या विरोधात लढाई ठेवली सामान्य नागरिकांच्या विरोधात आम्ही काहीही केलं नाही, असं पटेलांनी स्पष्ट केलंय.

follow us