दिल्लीत आज एनडीएची बैठक; राज्यातून एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार

दिल्लीत आज एनडीएची बैठक; राज्यातून एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार

NDA Meeting in Delhi : आजचा दिवस हा सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज एकीकडे नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यामध्ये दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. (NDA Meeting in Delhi Eknatha Shinde Ajit Pawar Prafull Patel will Attain from Maharashtra )

Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे कुंभ राशीचा आजचा दिवस

एनडीएच्या बैठकीला देशातील 38 पक्ष उपस्थित रहाणार आहेत. महाराष्ट्रातून शिवसेना, राष्ट्रवादी , जनसुराज्य, प्रहार चार पक्ष उपस्थित रहाणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ही बैठक सुरू होणार आहे. तर रात्री 10 वाजेपर्यंत ही बैठक पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भोजनानंतर ही बैठक संपणार आहे. या बैठकीचं नियोजन भाजप नेते अमित शाह, जे पी नड्डांच्या मार्गदर्शनाखाली पियूष गोयल, भुपेंद्र यादव, विनोद तावडे , संबित पात्रा पाहणार आहेत.

‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर सोमय्या बोललेच; थेट फडणवीसांकडे केली ‘ही’ विनंती

दरम्यान सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे या बैठकीला जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजच्या कार्यक्रमाचं वेळापत्रक समोर आलं आहे. त्यानुसार आज मुख्यमंत्री शिंदे हे अगोदर विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. तसेच ही बैठक जरी रात्री 10 वाजेपर्यंत चालणार असली तरी मुख्यमंत्री मात्र सायंकाळी 7 वाजता दिल्लीतून पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत.

दुसरीकडे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने एनडीए आणि विरोधकांची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. खरे तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी एकाच दिवशी बैठक घेऊन कोण बलाढ्य आहे हे दाखवायचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube