Download App

पवारांबाबत आता ‘या’ आमदाराने वर्तवली भविष्यवाणी! म्हणाले… मोदी, शहांनी हिरवा कंदील दाखवला की…

  • Written By: Last Updated:

Ravi Rana : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा धमाका होणार असून राज्यात नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच अजित पवार यांच्या भूमिकेबाबत पुन्हा तर्क-वितर्काना उधाण आले आहे.

बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सोमवारी (दि. १७) रोजी ही भविष्यवाणी केली आहे. रवी राणा म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील आला की अजित पवार हे नॉट रिचेबल होतील. अजित पवार हे निश्चितपणे भाजप सोबत जातील.

अतिक-अशरफ हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेलेले ते दोघे कोण? – Letsupp

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कोणत्याही क्षणी हिरवा कंदील येण्याची शक्यता आहे. तो आला की अजित पवार हे नॉट रिचेबल होतील. अजित पवार हे निश्चितपणाने भाजपच्या सोबत सत्तेत येणार आहे, असा ठाम विश्वास आमदार रवी राणा यांनी अजित पवार यांच्या विषयी व्यक्त केला आहे.

Tags

follow us