Download App

Israel Hamas War : ..म्हणून फडणवीसांनी केली शरद पवारांना विनंती म्हणाले, तुम्हीही…

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरूच आहे. या युद्धाचे जगभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. त्यावर भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शरद पवार यांना खोचक सल्ला दिला आहे. इस्त्रायल पॅलेस्टाइन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदललेली नाही. मात्र त्याचवेळी दहशतवाद मग तो कोणत्याही स्वरुपात आणि कुणाच्याही विरोधात असो, त्याला कायमच कडाडून विरोध केला आहे. इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले जातात तेव्हा संपूर्ण जगान त्याची निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला.

Uddhav Thackeray : ‘मोदी सरकारच्या काळात कर्जबुडव्यांना ‘अच्छे दिन’; ठाकरे गटाचा घणाघात

शरद पवार यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवा. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषतः 26/11 च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. त्यामुळे केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करू नका तर दहशतवादाचा तीव्र शब्दांत धिक्कार करा अशी शरद पवार यांना विनंती आहे, असे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार ?

ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथं अतिक्रमण झालं आणि इस्त्रायल देश उदयाला आला. मला जास्त खोलात जायचं नाही. संपूर्ण जमीन पॅलेस्टाइनची आहे आणि इस्त्रायलने त्यांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. ती जागा, जमीन आणि घरे सर्व काही पॅलेस्टाइनच्या मालकीचे होते आणि नंतर इस्त्रायलने त्यावर कब्जा केला. इस्त्रायल हा बाहेरचा देश आहे आणि ही जमीन मूळ पॅलेस्टाइनची आहे. जे मूळचे इस्त्रायलचे रहिवासी आहेत त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे.

बारा दिवसांनंतर मिळाली मदत 

काल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन इस्त्रायलमध्ये दाखल झाले. यानंतर त्यांनी येथे मोठी घोषणा केली. गाझा आणि वेस्ट बँकमध्ये मानवता मदतीसाठी त्यांनी 100 मिलियन डॉलर्स (832 कोटी रुपये) मदतीची घोषणा केली. यामुळे दहा लाखांहून अधिक विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना मदत मिळेल. याकामी इस्त्रायलही मदतीसाठी तयार झाला आहे. आज बारा दिवसांनंतर अखेर गाझातील नागरिकांना मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. 

Israel Hamas War : ‘गाझा’साठी अमेरिकेची मदत; बायडेन यांची मोठी घोषणा

Tags

follow us