Download App

कल्याण : श्रीकांत शिंदे पडणार? ‘वाघिणीला’ मैदानात उतरवत ठाकरे मोठा डाव खेळण्याच्या तयारीत!

कल्याण लोकसभा मतदारसंघ. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा मतदारसंघ असल्याने आजच्या घडीला व्हीआयपी बनला आहे. त्यामुळेच आपसुकच या मतदारसंघाची राज्यभरात चर्चा होत आहे. हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा गड मानला जातो. गत दोन्हीवेळा श्रीकांत शिंदे इथून दणदणीत बहुमताने निवडून आले. 2014 मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्याने, तर 2019 मध्ये साडे तीन लाख अशा प्रचंड मताधिक्याने निवडून आले. पण यंदा मात्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी यंदाची लढाई दुहेरी मानली जात आहे.

याचे कारण म्हणजे एका बाजूला भाजपने मित्रपक्ष असूनही या मतदारसंघात वाढवलेली ताकद आणि आगामी निवडणुकीसाठी मतदारसंघावर ठोकलेला दावा अशी परिस्थिती आहे. तर दुसऱ्या बाजूला विखुरलेल्या शिवसेनेची ताकद, ठाकरे गटाने कोणत्याही परिस्थितीत जागा पुन्हा जिंकण्याचा बांधलेला चंग आणि खेळलेला मोठा डाव. (It is being demanded that Sushma Andhare should be nominated in Kalyan against Srikant Shinde.)

पहिल्या लढाईत म्हणजे भाजप-शिवसेनेतील वादात कदाचित शिवसेनेचा विजय होईल. कारण ही जागा सध्या शिवसेनेकडेच आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असल्याने त्यांची जागा घेतल्यास भाजपबद्दल चुकीचा मेसेज जाऊ शकतो. पण प्रेशर पॉलिटिक्स खेळत भाजप दुसरीकडे काही तरी जास्त पदरात पाडून घेऊ शकतो. मात्र दुसरी लढाई श्रीकांत शिंदे यांच्यासाठी जास्त आव्हानात्मक मानली जात आहे. यामागील कारणेही तशीच आहेत. आता हीच नेमकी काय कारणे आहेत, ही लढाई नेमकी आव्हानात्मक का आहे? ठाकरेंकडून असा कोणता डाव खेळण्यात येणार आहे? तेच आपण पाहुया.

सध्या शिवसेना पडलेल्या दोन गटांमुळे अनेक आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहेत. अशात निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि आता विधानसभा अध्यक्ष या तिन्ही ठिकाणी शिंदेंच्या बाजूने निकाल दिला आहे. या सर्वांनंतर ठाकरे गटाकडून शिवसैनिकांना भावनिक आधारावर साद घातली जात आहे. ठाकरे गटाच्या बाजूनेही सहानुभूतीचे वातावरण आहे. यामुळेच जर शिंदेंना स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघातच आपली भूमिका पटवून न देता आल्यास त्याचा मोठा फटका श्रीकांत शिंदे यांना बसू शकतो.

Devendra Fadnavis : ‘मी मुर्खांना उत्तरं देत नाही’; राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीसांचा संताप

त्याचवेळी ठाकरे गटाने खासदार श्रीकांत शिंदे यांना राजकीय आखाड्यात कसे चितपट करायचे याचे डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. या डावपेचातील सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असणार आहेत ते म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे नेमके कोणाला मैदानात उतरविणार? हे नाव अद्याप गुलदस्त्यात असले तरीही अनेक जणांचे नावे चर्चेत आहे. मध्यंतरी तर थेट आदित्य ठाकरे यांचे नाव कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी पुढे आले होते. तर माजी आमदार सुभाष भोईर यांचे नावही अनेक दिवसांपासून चर्चेत आले.

त्यात आता ठाकरे गटाच्या फायरब्रॅण्ड नेत्या आणि प्रवक्ता सुषमा अंधारे यांचे नाव पुढे आले आहे. डोंबिवलीचे शहरप्रमुख विवेक खामकर यांनी थेट ठाकरे यांना पत्र देऊन अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची गळ घातली आहे.श्रीकांत शिंदेंच्या तोडीचा उमेदवार असला पाहिजे, त्यासाठी अंधारेंना या ठिकाणी उमेदवारी द्यावी, अशी मागणी खामकर यांनी केली आहे. अंधारे या फायरब्रँण्ड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. उद्धव ठाकरे गटात आल्यानंतर त्यांना थेट पक्षात उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. या जबाबदारीनुसार त्या थेट एकनाथ शिंदे यांच्या गटावर तुटून पडतात.

Kanni New Poster : मकर संक्रांत अन् पतंग उडवण्याचा आनंद लुटत, ‘कन्नी’चे नवीन पोस्टर झळकले!

महाप्रबोधन यात्रेतून त्यांनी शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर थेट टीका केली होती. त्यातून शिंदे गटाचे आमदार व सुषमा अंधारे यांच्या थेट शाब्दिक युद्ध झाले आहेत. अगदी एकमेंकाविरुद्ध अब्रुनुकसानीच्या दावा दाखल करण्यापर्यंत खटके उडाले आहेत. कुणाचेही भिडभिड त्या ठेवत नाहीत.त्यामुळे त्यांचे नाव पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी ही प्राथमिक मागणी आहे, पण यावर उद्धव ठाकरे खरेच विचारतात का? हे काही दिवसातच समोर येईल. अंधारे यांनी जर कल्याणमधून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली तर श्रीकांत शिंदे यांच्यासाठीही ही लढाई नक्कीच सोपी नसणार.

कल्याणमध्ये कोणाची किती ताकद?

कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा कळवा विधानसभेचा समावेश आहे. बालाजी किणीकर यांच्या रुपाने अंबरनाथ हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तर उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी हे भाजपचे आमदार आहेत. मुंब्रा कळवामध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत. याच मतदारसंघात मनसेचा महाराष्ट्राताली एकमेव आमदार आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील आमदार आङेत. तर डोंबिवलीमध्ये भाजपचे रविंद्र चव्हाण आणि कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड असे आमदार आहेत. म्हणजे सहापैकी केवळ एक आमदार शिवसेनेचा आहे. तर तीन भाजपचे एक राष्ट्रवादी आणि एक मनसे अशी परिस्थिती आहे.

2014 आणि 2019 मध्ये मतांची आकडेवारी :

2014 :

श्रीकांत शिंदे, शिवसेना – 4 लाख 40 हजार 892

आनंद परांजपे, राष्ट्रवादी – 1 लाख 90 हजार 143

प्रमोद पाटील, मनसे – 1 लाख 22 हजार 349

शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे 2 लाख 50 हजार 749 मतांची आघाडी घेत विजयी झाले होते.

2019 :

श्रीकांत शिंदे, शिवसेना – 4 लाख 51 हजार 346

बाबाजी पाटील, राष्ट्रवादी – 1 लाख 24 हजार 925

संजय हेडावू, वंचित बहुजन आघाडी – 52 हजार 360

शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे 3 लाख 26 हजार 421 मतांची आघाडी घेत विजयी झाले होते.

follow us

वेब स्टोरीज