Download App

महायुती 45 जागा जिंकण्याचा अंदाज : शिंदे-फडणवीस-पवारांच्या डावपेचांपुढे ‘मविआ’ला गाशा गुंडाळावा लागणार

Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘अबकी बार 400 पार’चा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रातही महायुतीने 45+ चा नारा दिला आहे. अशात आता महायुती हे टार्गेट गाठू शकते, महायुतीचा 45 जागांवर विजय होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये हा अंदाज बांधण्यात आला आहे.

झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशात 377 आणि महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला देशात 93 आणि महाराष्ट्रात केवळ तीन जागा जिंकता येऊ शकतात, असाही अंदाज बांधण्यात आला आहे. (It is estimated that the grand alliance can win 45 seats. This was predicted in an opinion poll by Zee Media-Matrix)

ज्यांना कोणी विचारलं नाही, त्यांना मी पूजलं; PM मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

देशात भाजपने 370 आणि एनडीएने 400+ जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर महाराष्ट्रात एकूण 45 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. हेच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 23 जागांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. आपल्या हक्काच्या 23 जागा पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने निवडणूक निरीक्षकाची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे या निवडणूक निरीक्षकामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

बच्चू कडूंना ‘शिंदे सरकारची’ स्पेशल ट्रिटमेंट : जिल्हा बँकेचे अध्यक्षपद वाचविण्यासाठी थेट कायद्यातच बदल

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांच्या नावांच्या चर्चा सुरु आहेत. यामध्ये विशेषत: गिरीश महाजन, पंकजा मुंडे, आणि सुधीर मुनगंटीवार यांची नावे अग्रस्थानी असून, आता राज्यातील 23 लोकसभां जागांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यात पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व तर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यात सध्या महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. शिंदे यांनी 17 ते 18 जागांवर दावा केला आहे. तर शिंदेंएवढ्याच जागा आपल्याला मिळाव्या असा आग्रह अजित पवार यांनी धरला आहे. त्यामुळे या सगळ्यावर नेमका कसा तोडगा निघतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र एनडीएने भारतात 400 आणि महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

follow us