Download App

…म्हणून विरोधक मंगळसूत्र चोर म्हणतात; पडळकरांच्या खास मित्राने सांगितली ‘ती’ घटना

Gopichand Padalkar यांना विरोधक मंगळसूत्र चोर म्हणतात . त्यात किती तथ्य आहे? हे पडळकर यांचे मित्र जगन्नाथ जानकर यांनी मुलाखतीतून सांगितलंय.

Jagannath Jankar on Gopichand Padalkar for Criticism by Opposion MangalSutra Chor : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कारण विधानभवनात त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण. मात्र हे प्रकरण सुरू झालं ते पडळकर यांच्यावर आरोप करताना विरोधक त्यांना मंगळसूत्र चोर म्हणतात त्यावरून मात्र हे कितपत खरं आहे. त्यात किती तथ्य आहे? हे पडळकर यांचे मित्र जगन्नाथ जानकर यांनी मुलाखतीतून सांगितलंय.

काय म्हणाले जगन्नाथ जानकर?

पडळकर यांच्याविषयीचे अनेक किस्से यावेळी पडळकर यांचे मित्र जगन्नाथ जानकर यांनी लेट्सअपला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये सांगितले. यावेळी विशेषत: त्यांना पडळकर यांच्यावर आरोप करताना विरोधक त्यांना मंगळसूत्र चोर म्हणतात. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, गोपीचंद पडळकर आणि मी तसेच इतर 13 जणांवर 2012 दरम्यान एक 395 चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका लग्नामध्ये कार्यकर्त्याची किरकोळ बाचाबाची झाली होती.

इंडिया फर्स्ट! ‘वॉर 2’ ट्रेलरमध्ये ऋतिक-एनटीआरची शपथ, सोशल मीडियावर धुमाकूळ

तिथे मी आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित देखील नव्हतो. पण गोपिचंद पडळकरांचं राजकारण थांबवण्यासाठी प्रस्थापितांनी त्यांना भविष्यात हे अडचणीचे ठरू नये म्हणून पडळकरांच्या पाहुण्या रावळ्यांकडूनच हा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये 395 आणि 307 चा असा दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये आम्हाला 13 जणांना सांगलीच्या जेलमध्ये तुरूंगवास झाला. त्यानंतर न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त देखील केलं.

follow us