जळगाव जिल्हा बँकेसाठी भाजपने आखली रणनीती; मंगेश चव्हाणांवर जबाबदारी, महाजन-खडसेंच्या नावांची चर्चा

Jalgaon District Bank Election जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला.

Jalgaon District Bank Election

Jalgaon District Bank Election

Jalgaon District Bank Election; BJP Strategy and Political Equations: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर मंत्री, आमदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने मंजूर झालेल्या ठरावांमुळे निवडणुकीच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यामुळे यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीत कोणत्या राजकीय समीकरणांना आकार येतो, याकडे लक्ष लागले आहे.

एन्काउंटर झालं तर देश जागा होईल! लेह हिंसाचाराच्या वर्षपूर्तीनिमित्त सोनम वांगचुक आक्रमक

नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता

जिल्हा बँकेची मागील निवडणूक 21 नोव्हेंबर 2021 रोजी झाली होती. त्यामुळे यंदाही नोव्हेंबर महिन्यात किंवा दिवाळीनंतर निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवायची की सर्वपक्षीय पातळीवर चर्चा करून बिनविरोधचा मार्ग स्वीकारायचा, याबाबत राजकीय नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

भाजपकडून जिल्हा बँकेसाठी मोर्चेबांधणी

जळगाव जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. यापूर्वी दूध संघ आणि महानगरपालिका निवडणुकीतील पक्षाच्या रणनीतीत महत्त्वाची भूमिका बजावलेले आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

‘सत्तेतले रेडे ज्ञानेशांकडून आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंनी भाजपसह ज्ञानेश कुमारांवर केला शाब्दिक हल्लाबोल!

चव्हाण यांनीही तयारीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. पक्षाची संघटनात्मक स्थिती आणि स्थानिक राजकीय समीकरणांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात दौरे केले आहेत. जळगाव शहरात त्यांनी एका माजी मंत्र्यांची रात्री उशिरा भेट घेतली. या भेटीत बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भाजपकडे 11 जागांचे लक्ष्य?

जळगाव जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद मोठी असून त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचेही तेथे चांगले राजकीय अस्तित्व आहे. भाजपकडे असलेल्या राजकीय ताकदीच्या आधारावर जिल्हा बँकेवर बहुमत मिळवण्याची भाजपची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा बँकेच्या एकूण 21 संचालकपदांपैकी किमान 11 जागा जिंकण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले असल्याची चर्चा आहे.

आमचा काहीही संबंध नाही! स्वीडनच्या संसदेत पोहोचलेल्या नीला विखे पाटील यांचा काकांबाबत मोठा खुलासा

नेते आणि कुटुंबीयही निवडणुकीच्या रिंगणात?

निवडणुकीत पक्षाचे प्रस्थापित नेते तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची झाल्यास किंवा सर्वपक्षीय समझोता झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याची राजकीय गणितेही मांडली जात आहेत.

महाजन, खडसे व चव्हाणांच्या नावांची चर्चा

प्रारूप मतदार यादीतील ठरावांमुळेही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या यादीत मंत्री, आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने विविध संस्थांमधून ठराव झाल्याचे नमूद आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावाचा हिंगोणे आणि हिरापूर येथील संस्थांमधून ठराव असल्याचे प्रारूप मतदार यादीत नमूद करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथून, तर त्यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या नावाचा सुनसगाव येथील संस्थेतून ठराव झाल्याचे यादीत दिसून येते.

महिला सहकाऱ्याशी गैरवर्तनानंतर बंगळुरूतील कंपनीचा अजब निर्णय; ‘या’ चार राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही!

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या नावाने कर्की, कोथळी आणि घोडसगाव येथील तीन संस्थांमधून ठराव झाल्याचेही प्रारूप मतदार यादीत नमूद आहे. त्यामुळे या नावांच्या समावेशामुळे आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version