शासन आपल्या दारी कार्यक्रमाने पोटदुखी, लवकरच डॉक्टर आपल्या दारी; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

CM Eknath Shinde : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन जनतेच्या दारी येतोय. लोकांना शासकीय योजनांचा लाभ देतोय. हे पाहून अनेक लोकांना पोटदुखी सुटलेली आहे. पोटाचा आजार झालेला आहे. त्यामुळे या पोटदुखीवर आम्ही लवकरच डॉक्टर आपल्या दारी कार्यक्रम सुरु करणार असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा […]

_LetsUpp (5)

uddhav thackeray eknath shinde

CM Eknath Shinde : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन जनतेच्या दारी येतोय. लोकांना शासकीय योजनांचा लाभ देतोय. हे पाहून अनेक लोकांना पोटदुखी सुटलेली आहे. पोटाचा आजार झालेला आहे. त्यामुळे या पोटदुखीवर आम्ही लवकरच डॉक्टर आपल्या दारी कार्यक्रम सुरु करणार असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा पहिलं वहिलं गाणं ‘गणराज गजानन’ भाविकांच्या भेटीला

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेतून केली. घराघरात शासनाच्या योजना पोहोचल्या आहेत. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. गेल्या अडीच वर्षात थांबलेले प्रकल्प आपण सुरु केले.

जरांगेंकडून सरकारला एक महिना; उपोषण सोडण्यासाठी सीएम, डीसीएम, दोन्ही राजेंनी यावे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकप्रतिनीधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत. आणि ही दोन चाकं जेव्हा समान वेगाने धावतात, तेव्हा त्या शहराचा, जिल्ह्याचा, राज्याचा विकास होतो. म्हणून या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांपासून, बीडीओ, विभागीय आयुक्त असेल, तलाठी असेल हे लाभार्थ्याची नोंद घेतात, त्याच्या घरापर्यंत जातात. म्हणूनच हे सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमातून गतिमान झालेलं आहे.

महिला बचत गटासाठी आपण आपल्या सरकारने सीआरपीचे मानधन वाढवले. एसटीमध्ये महिलांना 50 टक्के सवलत दिली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला. केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी 6 हजार रुपयांची योजना होती. त्यावर राज्य सरकारने त्यात 6 हजार रुपये देत आहे. म्हणजे शेतकऱ्याला एकूण वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहेत.

Exit mobile version