Download App

शिवसेनेची काँग्रेस होणार नाहीच, हिंदुत्व दाखवूनच देतो; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं!

Uddhav Thackeray : राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगाव दौऱ्यावर आहे. जळगावात पोहोचताच ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली. जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या वचनपूर्ती सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यासह शिंदे-फडणवीसांवर घणाघाती टीका केली. त्यांच्याकडून शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे फलक लावले जात आहेत. पण, मी सांगतो शिवसेनेची कधीच काँग्रेस होणार नाही. जसे 25 वर्षे युतीत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही तशी शिवसेनेची काँग्रेस कधीच होणार नाही. यांचं हिंदुत्व थोतांड आहे, त्यांना खरं हिंदुत्व दाखवूनच देतो, अशा आक्रमक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.

पाणीपुरवठा मंत्र्याच्या गावात प्यायला पाणी नाही; दानवेंचा गुलाबरावांवर घणाघात

मुंबईत इंडियाची बैठक पार पडली. याचं अध्यक्षपद शिवसेनेकडं होतं. माझ्याकडे पक्ष आणि चिन्ह नसतानाही काही का होईना पण मला तिथं किंमत होती. बैठक झाल्यानंतर गद्दारांनी शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसह बॅनर लावलं. त्यावर मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं लिहीलं होतं. पण, 25 वर्षे युतीत असताना शिवसेनेची भाजप झाली नाही. मग, शिवसेनेची काँग्रेसही कधीच होणार नाही. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी केलेली नाही, अशी टीका उद्धव (Uddhav Thackeray) यांनी केली.

ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले, तुम्ही मतदान केलं. त्यानंतर या लोकांच्या डोक्यात हवा गेली. त्यांचे आता फुगे झाले आहेत. या फुग्यांना टाचणी लावण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. ही तुम्हीच मोठी केलेली माणसं आहेत. मी आज सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जातं. पटेलांना लोहपुरुष म्हटलं जातं. भाजप आणि आरएसएसने एकही आदर्श काम केलं नाही. फक्त चोरी केली. आता माझे वडील चोरायला निघाले आहेत. कर्तुत्व काहीच नाही. पटेलांचा पुतळा कितीही मोठा बांधा. तुम्ही कसले पोलादी पुरुष. लुटालूट करायची आदर्श म्हणून मिरवायचं हेच यांचे चाळे आहेत, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

आम्ही त्यांना गद्दारच म्हणणार

दिल्लीत सध्या जी 20 बैठक सुरू आहे. यासाठी आपले बेकायदा मुख्यमंत्री तिकडे गेलेत. बेकायदा हे कोर्टाचं म्हणणं आहे. पण आपल्यासाठी ते गद्दार आहेत त्यांना गद्दारच म्हणणार. तिकडे ऋषी सुनकला भेटले कोय बोलले ते सांगा,  नुसते फोटो काढून चमकोगिरी करायचं काम त्यांनी केले, असा टोला ठाकरे यांनी शिंदे यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्री तिकडे दिल्लीला गेलेत. तिकडे जायला वेळ आहे पण जरांगेकडे जायला वेळ नाही. पण, आम्ही तिकडे गेलो होतो. पोलिसांच्या अंगात असा राक्षस येणार नाही. शांततेत चाललेल्या आंदोलनात घुसू शकता का?, लाठीमार करु शकता का?, ही परिस्थिती म्हणजे जालनावाला कुणीतरी उपटला आहे, अशी जहरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर केली.

‘चार गद्दार टकल्यांना जनता जोडे-चपला मारेल’; संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल

Tags

follow us

वेब स्टोरीज