विधानपरिषद निवडणूक लढणार का ? जय पवारांनी स्वतःचं दिली मोठी माहिती

पक्ष नेतृत्व जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी असलेला, दूरदृष्टी असलेला आणि नेतृत्वगुणांनी कार्यक्षम उमेदवार निश्चित करेल-जय पवार

Jay Pawar

Jay Pawar

Jay Pawar On Vidhan Parishad election: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) हे राज्यसभेवर गेले आहेत. आता जय पवार (Jay Pawar) हे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. सोशल मीडियावर असे पोस्टर फिरत होते. तर राष्ट्रवादीतील (NCP) काही नेतेही त्यासाठी आग्रही होते, अशी राजकीय चर्चा होती. परंतु या चर्चेला स्वत: जय पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.

मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, असे जय पवार यांनी स्पष्ट केले आहे. पक्ष नेतृत्व जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी असलेला, दूरदृष्टी असलेला आणि नेतृत्वगुणांनी कार्यक्षम उमेदवार निश्चित करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आदरणीय ‘दादां’ची विकासाभिमुख विचारसरणी आणि लोकहिताचे कार्य पुढे नेत, प्रलंबित प्रश्नांना ठोसपणे मार्गी लावणारा तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी निष्ठेने कार्य करणारा चेहरा पक्ष निश्चितपणे जनतेसमोर आणेल, असे जय पवार यांनी म्हटले आहे.

2029 ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? युगेंद्र पवार म्हणाले एका वर्षात खूप काही गोष्टी…

भाजपा विरुद्ध राष्ट्रवादीत जागेवरून रस्सीखेच..
पुण्यात राष्ट्रवादीकडे सर्वाधिक 344 मतदार आहेत. तर भाजपकडे 306 मतदार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 68 सदस्य आहेत. तर काँग्रेसकडे 19, राष्ट्रवादीकडे 17 आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेकडे 11 मतदार आहेत. या जागेसाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. परंतु राष्ट्रवादी ही जागा भाजपला सोडणार नसल्याचे जय पवार यांच्या म्हणणानुसार दिसून येत आहे.

आता व्हॉट्सअपवर नंबरने नाही तर, युझरनेमने होणार चॅटिंग; जाणून घ्या, कसं करायचं User Name सेट?


राष्ट्रवादीकडून कुणाला मिळणार संधी?

पुणे विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक पदाधिकारी, माजी आमदार इच्छुक आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वापुढे उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहेत. या जागेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे माजी आमदार दिलीप मोहिते, अजित गव्हाणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Exit mobile version