Ncp Crisis : सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची पदे सुनेत्रा पवार यांनी काढून घेतली?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बंडाचे संकेत दिसून येत असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्रावरुन चर्चेला उधाण आलंय.

Untitle (15)

प्रशांत गोडसे
लेट्सअप प्रतिनिधी

National Congress Party : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (National Congress Party ) सध्या पडद्यामागे मोठे राजकीय नाट्य रंगले असून पक्षांतर्गत वादाचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढूनच घेतली असल्याचं चित्र सध्या राष्ट्रवादीत दिसून येत आहे. पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना झुकते माप देण्याच्या मुद्द्यावरून पक्षात आता स्पष्टपणे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. या अंतर्गत संघर्षामुळे सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.

पिंग शुन जहाजाची भारतात एंट्री ठरणार गेमचेंजर? तब्बल 7 वर्षांनंतर पहिली इराणी तेल डिलिव्हरी

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक खळबळजनक पत्र धाडले आहे. २८ जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कोणताही अधिकृत पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी आग्रही विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. घटनेतील बदलांमुळे अधिकारांच्या वाटपावरून हा वाद विकोपाला गेल्याचे समजते. या वादावर पडदा टाकण्यासाठी दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या खुलाशानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे समाधान झाले नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; प्रेमप्रकरणातून तरुणाचं टोकाचं पाऊल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेबाबत नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ताज्या पत्रात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदाचा उल्लेखच नसल्याने प्रफुल पटेल यांच्या भूमिकेबाबत, पदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पत्रात फक्त राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांचाच उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या पत्रात प्रफुल पटेल यांचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून स्पष्ट उल्लेख होता, त्यामुळे पक्षातील अंतर्गत बदलांविषयी चर्चा रंगू लागल्या आहे.

दिग्गज कलाकारांच्या प्रभावी अभिनयाने साकारलेला ‘राजा शिवाजी’ फर्स्ट लूक आता डिजिटलवर

दरम्यान, पत्रावरून उद्भवलेला हा कायदेशीर आणि राजकीय तिढा सोडवण्यासाठी सध्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या आणि दिग्गज नेत्यांच्या तातडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दिल्लीत असून भाजपा श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ऐन राजकीय धामधुमीत राष्ट्रवादीतील हा कलह नेमके कोणते वळण घेतो? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत कलहावरुन शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनीही खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केलीयं. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं असून ते म्हणाले, लबाडी कधी ना कधी उघडी पडते. यांनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीए मध्ये जाण्यास भाग पाडले होते. कारण हे 2013/14 पासून भाजपचे हस्तक म्हणून राष्ट्रवादीत कार्यरत होते. भाजपच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची घटना बदल करुन दादांचा पक्ष ताब्यात घेण्याचा चौकडीचा प्रयत्न फसला. त्यांचे सर्व मनसुबे उधळले. हळू हळू आणखी काही काळ्या गोष्टी आगामी काळात बाहेर येणार आहेत. या दोघांना साथ देणाऱ्या इतरांनी पत्रकार परिषद घेऊन सत्य बोलण्याची हिंमत दाखवावी, असं लवांडेंनी म्हटलंय.

follow us