Jayant Patil again ED Notice : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना पुन्हा एकदा ईडीची नोटीस आली आहे. यामध्ये आता त्यांना सोमवारी 22 मे ला चौकशाचे आदेश देण्यात आले आहेत. ही नोटीसमध्ये जयंत पाटलांना ईडीची ही नोटीस आय एल अॅंड एफ एस या प्रकरणावर आली आहे. दरम्यान त्यांना या अगोदर देखील चौकशीला हजर राहण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले होते.
ED issues fresh summons to NCP leader Jayant Patil for questioning on May 22 in IL&FS money laundering case: Officials
— Press Trust of India (@PTI_News) May 15, 2023
मात्र चौकशीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी जयंत पाटील यांनी ईडीकडे केली होती. त्यांच्या घरी असलेल्या काही वैयक्तिक कार्यक्रमांमुळे त्यांनी ही वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. दरम्यान ईडीची नोटीस मिळाल्यानंतर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, मी ज्या पद्धतीने राज्यात वावरतो बोलतो याची पूर्ण जाणीव जनतेला आहे. जनतेला कोणत्या प्रकारचे लोक काय करू शकतात याची कल्पना आहे. त्यामुळे मला चिंता वाटत नाही.
16 आमदारांच्या प्रकरणावरुन ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवणार?
आयएल अॅंड एएसकडून एका कंपनीने कर्ज घेतलं होत. या कंपनीचं कनेक्शन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी असल्याचं बोललं जात आहे. याच कारणामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. या कंपनीने 2019 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती. तर लोकांच्या पैशांचं मनि लॉन्ड्रींग केल्याचा आरोप आहे. तर याच प्रकरणात राज ठाकरे यांची देखील चौकशी झाली होती.