Download App

मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा प्रयत्न…; जयंत पाटलांची बोचरी टीका

मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) दोन ते तीन महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मागणी महायुतीमधील काही आमदारांकडून केली जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होणार असल्याची प्रतिक्रिया दिली. यावरून आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकावर जोरदार टीका केली.

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी… 

मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे, असा टोला पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.

जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, ही शेवटची संधी आहे. त्यामुळे बरेच आमदार मागे लागले आहेत की मंत्रिपदाचं स्वप्रन किमान दोन महिन्यांसाठी तरी पूर्ण करा. त्यामुळं काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा महायुती सरकारचा शेवटचा प्रयत्न आहे. कारण, परत महायुतीचं सरकार येईल याची खात्री नाही. त्यामुळं जर पुन्हा सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोड्या दिवसांसाठी तरी मंत्री करा, असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली.

Paaru Serial: पुन्हा होणार सत्याची सत्वपरीक्षा! हरीशशी लग्न मोडल्यानंतर पारू सगळ्यांना सत्य सांगू शकेल का? 

राज्यात जवळपास दोन वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यासाठी शिंदेंच्या सेनेचे अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. मात्र, त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याची अवस्था होती. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर आमदार नाराज होतील, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लवकरच मंत्रीमंडळ होणार असल्याचं विधान केलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होईल. तुम्हाला लवकरच याबद्दलची बातमी देईन, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

 

follow us