ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी…
Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) तयारी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. यादरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आता पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे.
अजितदादांचं मिशन विधानसभा निलेश लंकेंच्या पारनेरमधून; महिलांशी संवाद साधणार
निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निधी स्वीकारण्यास नुकतीच मंजुरी दिली होती. शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनीही निवडणूक आयोगाकडे पक्षनिधी स्वीकारण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली होती. अखेर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंची ही मागणी मान्य केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेला निधी स्वीकारता येणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली होती. शिवेसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट झाले होते. दरम्यान, शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिलं होतं. तर ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह स्वीकारावे लागले. तसेच त्यांना पक्षाचं नावही बदलाव लागलं. शिवसेना फुटीनंतर पक्षनिधीची प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोग आणि न्यायालयात पोहोचला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी नव्हती.
यानंतर पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर आज गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी दिली.