Download App

छगन भुजबळ कोणत्या गटात? जयंत पाटील म्हणाले, ‘उद्या संध्याकाळी…’

छगन भुजबळ हे महायुतीत आहेत की, मविआसोबत आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Jayant Patil On Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal) हे गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या विरोधात बोलत आहेत. अनेकदा त्यांची भूमिका ही महाविकास आघाडीसाठी पोषक वाटते. नुकतचं आमदार जिंतेद्र आव्हाडांनी (Jintendra Avhad) मनुस्मृतीचं दहन करतांना अनावधाने बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला. त्यावरून भाजपने आव्हाडांवर टीका केली. मात्र, भुजबळांनी आव्हाडांची पाठराखन केली होती. त्यामुळे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे महायुतीत आहेत की, मविआसोबत आहेत?  अशी चर्चा सुरू झाली. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Sanya Malhotra ठरली ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये ‘मिसेस’ साठी गौरव 

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, एक्झिट पोलचे आकडे काहीही असले तरी उद्या संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, 2019 मध्ये पुलवामामुळे भाजपाच्या जागा वाढल्या होत्या. मात्र, आता तशी परिस्थिती नाही, असं पाटील म्हणाले.

दुष्काळावर कोणतीही पाऊले उचलली नाहीत ; शरद पवार राज्य सरकारवर बरसले !

छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळं भुजबळ हे शरद पवार गटात आहेत की, अजित पवार गटात आहेत? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की, तुम्ही मला उद्या निकालानंतर भेटा. तेव्हा मी यावर उत्तर देईल.

हे उत्तर फक्त भुजबळांबद्दल आहे की, इतरांबद्दलही आहे? असा सवाल पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की, केवळ भुजबळांच्या बाबतीत नाही तर इतरांबाबतचाही संभ्रम दूर होईल. भुजबळांचा विषय थोडा वेगळा आहे. ते कोणत्या बाजूला आहे, ते मी उद्या संध्याकाळी सांगतो. त्याविषयी आत्ता बोलण्यात, अंदाज वर्तवण्यात काही अर्थ नाही.

मी पक्ष सोडणार नाही : पाटील

मी पक्ष सोडणार नाही, काही लोक आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणीही त्यांना बळी पडू नका. अनेक जण आम्हाला आमंत्रण देत असतात, त्याचा कामावर परिणाम होत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

follow us