अखेर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडणं आलं अंगलट
Case Flied on Jitendra Awhad due to Tore Dr. Babasaheb Ambedkar Photo : राष्ट्रवादीची (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर अखेर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आंदोलनादरम्यान त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा (Babasaheb Ambedkar) फोटो फाडणे आव्हाडांना चांगलच भोवलं आहे.
ब्लड सॅम्पल हेराफेरीप्रकरणी मोठी कारवाई! ससूनचे डीन बदलले, तावरेसह तिघे निलंबित
काय आहे नेमकं प्रकरण?
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव ‘एससीईआरटी’ने मांडल्यानंतर राष्ट्रवादीची (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रस्तावाविरोधात त्यांनी आज (२८ मे) महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय.
नार्को टेस्ट, रिचार्जवाली अन् सुपारी घेणारी बाई; अंजली दमानिया-सूरज चव्हाण भिडले
आव्हाडांनी मागितली माफी…
दरम्यान आव्हाडांच्या या कृत्यानंतर विरोधकांकडून विशेषतः अजित पवार गटाकडून त्यांच्याविरोधात जारदार निदर्शने करण्यात आली. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरणं दिलं. ते म्हणाले की, मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकात समावेश होत असल्याच्या निषेधार्थ आम्ही महाड येथं आंदोलन केलं. कारण, मनु हा विषमतेचा जन्मदाता आहे. स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे. अशा मनुचा शालेय पुस्तकात समावेश करू नये, यासाठी आम्ही आंदोलन केलं. यावेळी निषेध म्हणून आम्ही मनुस्मृती लिहिलेलं पुस्तक फाडलं. त्यावर बाळासाहेबांचा देखील फोटो होता, हे लक्षात आलंचं नाही. त्यामुळं बाबासाहेबांचा फोटोही फाडल्या गेल्याचं आव्हाड म्हणाले.
पुढं बोलतांना ते म्हणाले, माझ्याकडून अनावधानाने हे घडलं. ही आमची अक्षम्य चूक आहे. आम्ही काही मुद्दाम केलेलं नाही. मनुस्मृती फाडल्याचं दाखवावं म्हणून आम्ही ते पोस्टर फाडलं. त्यातून कोणृणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, कृपया महाराष्ट्रातील जनतेने मला माफ करावे, अशा शब्दात आव्हाडांनी माफी मागितली.