Download App

‘चार जागा लढवणार’; पण आम्हीच जिंकणार, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

Jayant Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाकडून(Ajit pawar group) शरद पवार गटावर(Sharad pawar group) जोरदार हल्लाबोल चढवला जात आहे. कर्जतमधील खोपोलीत आयोजित विचार मंथन शिबिरातून अजित पवारांनी(Ajit Pawar) मोठ-मोठे गौप्यस्फोट केला आहे. अजितदादांच्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, आम्ही लोकसभेच्या चारही जागा लढवणार असल्याची घोषणा अजितदादांनी केली आहे. अजितदादांच्या घोषणेनंतर शरद पवार गटाकडून तत्काळ प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. चारही जागा आम्हीच जिंकणार असल्याचं प्रत्युत्तर जयंत पाटलांनी(Jayant Patil) केलं आहे.

Ahmednagar News : पाऊस आला अन् घरी जायच्या आत आमचा…; विखे पाटलांसमोर शेतकऱ्याची व्यथा

जयंत पाटील म्हणाले, अजित पवार गट सध्या वेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे ते निवडणुका लढवणारच असतील कारण त्यांना त्यांचा पक्ष टिकवायचा आहे. आमचेही उमेदवार चारही लोकसभा मतदारसंघात मैदानात उतरणार आहेत, विजयी होतीलच कारण जनतेचा आशिर्वाद शरद पवारांच्या मागे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नसल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

Exit Poll 2023 Rajsthan : राजस्थानात कमळ की पंजा?; सर्वेक्षणातून निष्कर्ष आले समोर

काय म्हणाले अजित पवार?
मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित यंदा अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. नवीन सरकार आल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी व्हावेत ही आपल्या सगळ्यांची धारणा आहे. त्यासाठी राज्यात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या ज्या चार जागा आहेत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणारच आहोत. यासह इतर काही जागा उबाठाच्या जिथं ताकद जास्त जागा आहेत तिथं चर्चा करून जागावाटप करू. प्राथमिक चर्चा झाली होती. पण, पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे या काळात काही बातम्या आल्या तरी त्यावर विश्वास ठेऊ नका, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

भारतीयांना सातत्याने डिवचणारे अमेरिकेचे माजी मंत्री हेनरी किसिंजर यांचे निधन

दरम्यान, अजित पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर पक्षातील उमेदवारांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अजित पवार गटाकडून सातारा, बारामती, शिरुर, रायगड लोकसभा मतदारसंघातून कोणाची वर्णी लागणार? याचीच सध्या चर्चा रंगली आहे.

Tags

follow us