‘त्या’ आरोपीचे अनेक नेत्यांसोबत फोटो, मग त्यांनीही प्रोत्साहन दिलं? जयंत पाटलांचा राणेंना सवाल

Jayant Patil : अंतरवली सराटीत मराठा समाजाचे उपोषण सुरू असतांना दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी हृषीकेश बेदरेसह दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हृषिकेश बेदरे आणि शरद पवार यांचा फोटो ट्विट केला. बेदरे याने पवारांची भेट घेतल्याचं राणेंनी म्हटलं. त्यामुळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. […]

'त्या' आरोपीचे अनेक नेत्यांसोबत फोटो, मग त्यांनीही प्रोत्साहन दिलं? जयंत पाटलांचा राणेंना सवाल

Jayant Patal shared photos of Hrishikesh Bedre with Nitesh Rane,

Jayant Patil : अंतरवली सराटीत मराठा समाजाचे उपोषण सुरू असतांना दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी हृषीकेश बेदरेसह दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हृषिकेश बेदरे आणि शरद पवार यांचा फोटो ट्विट केला. बेदरे याने पवारांची भेट घेतल्याचं राणेंनी म्हटलं. त्यामुळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट कुणी रचला? असा सवाल करत राणेंचा पवारांकडे रोख होता. याला आता जयंत पाटी (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं.

चीनमध्ये न्यूमोनिया संकट! भारत सरकार अॅक्शन मोडवर, राज्यांना दिले तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत काही फोटो शेअर केले. या फोटोत नितेश राणेंसोबत हृषीकेश बेदरे दिसून येत आहे. तर अन्य एका फोटोत उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत हृषीकेश बेदरे असल्याचं दिसतं. पाटील यांनी लिहिलं की, आदरणीय पवार साहेबांच्या सोबतच्या एका कार्यकर्त्याचा फोटो व्हायरल करुन साहेबांवर तथ्यहीन आरोप काही निवडक लोकांकडून केले जात आहेत. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला रोज हजारो लोक येत जात असतात. फोटो काढण्यावर कोणतेही बंधन ठेवता येत नाही, ही बाब महाराष्ट्रातील जनतेला चांगलीच माहिती आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

चीनमध्ये न्यूमोनिया संकट! भारत सरकार अॅक्शन मोडवर, राज्यांना दिले तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश 

ते म्हणाले, सोबत फोटो असल्याने जर कोणत्याही दगडफेकीला प्रोत्साहन दिले जात असेल तर या व्यक्तीचे इतरही अनेक स्थानिक नेत्यांच्या सोबत जवळकीचे फोटो आहेत. म्हणून त्यांनी या आरोपीला दगडफेक करण्यास प्रोत्साहन दिले, असे म्हणायचे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषिकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपे यांची भेट घेतली. १ सप्टेंबरला पोलिसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबरला शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब, पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतयं? असा सवाल राणेंनी विचारला होता.

दरम्यान, आता जयंत पाटील यांनी अन्य नेत्यांसोबत हृषीकेश बेदरेचे फोटो शेअर केले. खुद्द नितेश राणेंचाही हृषीकेश सोबतचा फोटो शेअर केला. त्याला आता नितेश राणे काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version