चीनमध्ये न्यूमोनिया संकट! भारत सरकार अॅक्शन मोडवर, राज्यांना दिले तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश

  • Written By: Published:
चीनमध्ये न्यूमोनिया संकट! भारत सरकार अॅक्शन मोडवर, राज्यांना दिले तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश

China Pneumonia Outbreak: कोरोनासारख्या धोकादायक महामारीनंतर चीनमध्ये आणखी एक धोकादायक आजार समोर आला आहे. हा आजार लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम करतो. चीनमध्ये पसरलेल्या या आजाराला न्यूमोनिया (Pneumonia) म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य (Union Ministry of Health) मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.

मराठ्यांनाच सर्वाधिक प्रतिनिधित्व; 5105 कोटीही वितरीत : आकडेवारी सांगत भुजबळांचा हल्लाबोल 

आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 सारख्या आजारांवर पाळत ठेवण्यासाठी ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यास सांगितले आहे. जिल्हा आणि राज्य अधिकारी ILI/SARI (इन्फ्लूएंझा-सदृश आजार/तीव्र श्वसन संक्रमण) प्रकरणांवर लक्ष ठेवतील. इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, SARS-CoV-2 सारख्या कारणांमुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. मात्र, घाबरण्याची गरज नाही, फक्त नियमांचे पालन करा, असं या निवेदनात सांगण्यात आले आहे. सध्या देशात सतर्कतेची स्थिती नसल्याचेही सरकारने म्हटले आहे.

आय लव्ह नगर व जय आनंद फाऊंडेशनच्या पुढाकारातून ‘अहिंसा चौका’चे सुशोभिकरण 

आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाच्या परिस्थितीचा त्वरित आढावा घेण्यास सांगितले आहे. यासोबतच मानवी संसाधने, रुग्णालयातील खाटा, अत्यावश्यक औषधे, वैद्यकीय ऑक्सिजन, पीपीई, टेस्टिंग किट इत्यादींची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या गरजेवरही या निर्देशात भर देण्यात आला आहे.

काही मीडिया रिपोर्रटमध्ये उत्तर चीन भागातील लहान-सहान मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराची प्रकरणे आढळून आली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगिलते की, उपलब्ध माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांत श्वसनाच्या आजारांची प्रकरणे वाढली आहेत. त्यात म्हटलं आहे की, लहान मुलांमध्ये श्वसन रोगाची सामान्य कारणे ओळखली गेली आहेत आणि कोणतेही असामान्य रोगजनक किंवा कोणतेही अनपेक्षित क्लिनिकल नमुने ओळखले गेले नाहीत, असे त्यात म्हटले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube