चक्रं फिरली, पुतिन यांचा ट्रम्प यांना फोन; युक्रेनचा उल्लेख करत दिली मोठी ऑफर

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन दोन्ही देश युद्ध (Russia Ukraine War) संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रम्प-झेलेन्स्की भेटीनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी फोनवर चर्चा केली. पॉलिटिकोच्या वृत्तानुसार पुतिन यांनी झेलेन्स्की यांना रशियामध्ये भेटण्याची (Vladimir Putin) ऑफर दिली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपियन नेत्यांचे एक शिष्टमंडळ डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये आले तेव्हा ही ऑफर देण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे की पुतिन-झेलेन्स्की भेटीशी संबंधित चर्चा गांभीर्याने घेऊ नये. एका अधिकाऱ्याने सांगितले की काल सर्वांनी ही माहिती नाकारली आणि दुर्लक्ष केले परंतु आज माध्यमे याच गोष्टीचा मोठा मुद्दा बनवत आहेत.
व्हाइट हाऊसनं काय सांगितलं?
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगतिले की, पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील बैठकीवर चर्चा सुरू आहे आणि अनेक पर्यायांवर विचार केला जात आहे. ‘दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि आमची टीम या दिशेने काम करत आहे’. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी पुढे जाऊन पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यासोबत त्रिपक्षीय शिखर परिषदेचा प्रस्ताव दिला आहे. व्हाईट हाऊसमधील बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि उपस्थित नेत्यांना सांगितले की, या बैठकीची तयारी सुरू झाली आहे.
‘पूप सूटकेस’! पुतिन यांच्या विष्ठेची रहस्यमय सफर, पोर्टेबल टॉयलेट ते ब्रीफकेसपर्यंत झेड प्लस सुरक्षा
मॉस्कोची सावध भूमिका
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, ‘चर्चा करण्यात रशिया मागे नाही, परंतु चर्चा ही टप्प्याटप्प्याने आणि काळजीपूर्वक झाली पाहिजे. कोणत्याही शिखर परिषदेची तयारी तज्ज्ञांच्या पातळीवर सुरू करून नंतर आवश्यक टप्प्यांमधून गेली पाहिजे,’ असे त्यांनी रोसिया-24 टीव्ही चॅनेलवर सांगितले.
झेलेन्स्कीची भूमिका आणि अमेरिकेचा प्रतिसाद
युक्रेनकडून झेलेन्स्की यांनी चर्चेसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, ‘युक्रेन चर्चेसाठी तयार आहे आणि पुढील दहा दिवसांत शिखर परिषदेची घोषणा औपचारिकरित्या जाहीर केली जाऊ शकते’. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, ‘पुतिन यांनी झेलेन्स्की यांना भेटण्यास सहमती दर्शविली आहे आणि ही मोठी गोष्ट आहे. आपण अजून तिथे पोहोचलो नाही, पण हेच ध्येय आहे’.
अलास्का येथील ट्रम्प यांच्याशी (Alaska Summit) झालेल्या भेटीदरम्यान पुतिन यांनी त्यांच्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पुतिन म्हणाले की, ‘कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यापूर्वी संघर्षाच्या मूळ कारणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे’. म्हणजेच, शांतता चर्चेच्या शक्यता अजून कायम आहेत परंतु व्लादिमीर पुतिन यांच्या अटी या प्रक्रियेला अधिक गुंतागुंतीचे करत आहेत.
मतदानात गडबड अन् हॅकिंगची भीती; मतदान यंत्र हद्दपार करण्याची ट्रम्प सरकारची तयारी