मतदानात गडबड अन् हॅकिंगची भीती; मतदान यंत्र हद्दपार करण्याची ट्रम्प सरकारची तयारी

Donald Trump Latest News : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय (Donald Trump) घेण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेत व्होटींग मशीनच्या (Voting Machine) माध्यमातून मतदान प्रक्रिया बंद करण्याची ट्रम्प प्रशासनाकडून केली जात आहे. यासह ई मेलद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेला बंद करणार असल्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केले आहे. यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी लवकरच एक एक्झिक्युटिव्ह आदेश पारित करणार असल्याचे म्हटले आहे.
यानंतर 2026 च्या निवडणुकीत व्होटिंग मशीन आणि ई मेल मतदानावर बंदी घातली जाईल. स्वतः ट्रम्प अनेक वर्षांपासून व्होटिंग मशीन आणि ई मेल मतदानाच्या विरोध करत आहेत. व्होटिंग मशीन हॅक होऊ शकते असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल अकाउंटवरुन ही माहिती दिली. व्होटिंग मशीनच्या माध्यमातून निवडणुकीत हेराफेरी केली जाऊ शकते अशी भीती ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. मात्र अमेरिकेच्या निवडणूक इतिहासात अजून तरी अशी घटना समोर आलेली नाही.
पुतिन-ट्रम्प चर्चेचे अपडेट थेट मोदींकडे! भारत-रशिया संबंधांवर नव्या समीकरणांची चाहूल
डेमोक्रॅट्स मात्र ई मेल मतदानाच्या समर्थनात आहेत. ज्या लोकांनी प्रत्यक्षात येऊन मतदान करता येत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय सोयीस्कर आहे. वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना या सुविधेचा मोठा फायदा मिळतो असे डेमोक्रॅट्सचे म्हणणे आहे. ट्रम्प आणि रिपब्लीकन नेते मात्र या विरोधात आहेत. व्होटिंग मशीन हॅक होण्याची भीती त्यांना वाटते. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की आता मी एक मोहीम सुरू करणार आहे.
यात मेल इन बॅलट आणि अत्यंत चुकीच्या असलेल्या व्होटिंग मशीनला हद्दपार करण्याची कवायत असेल. वॉटरमार्क पेपरच्या तुलनेत मशीन दहा पट महाग आहे. पेपरच्या माध्यमातून होणारे मतदान वेगवान आणि कोणतीही शंका नसणारे असतात. पेपरच्या माध्यमातून पारदर्शक निवडणूक होते. निवडणुकीचे निकालही स्पष्ट असतात असे डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, भारतात ईव्हीएम मशीनवरुन चांगलाच गदारोळ उठलेला आहे. ईव्हीएम हॅक केली जाऊ शकते असा दावा विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जातो. यातच आता काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाला घाम (Election Commission) फोडला आहे. भारतात या घडामोडी सुरू असताना अमेरिकेत मतदान यंत्र बंद करण्याच्या हालचाली लक्षवेधी ठरल्या आहेत.
पुरस्कारासाठी आटापिटा, मला नोबेल द्या, नाहीतर…; नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना ट्रम्प यांची धमकी