पुतिन-ट्रम्प चर्चेचे अपडेट थेट मोदींकडे! भारत-रशिया संबंधांवर नव्या समीकरणांची चाहूल

पुतिन-ट्रम्प चर्चेचे अपडेट थेट मोदींकडे! भारत-रशिया संबंधांवर नव्या समीकरणांची चाहूल

Putin Call To PM Modi : रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संभाषणात पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अलास्का येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत (Alaska Ukraine War) झालेल्या चर्चेची माहिती दिली. हा फोन कॉल महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आजच अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये युरोपीय नेता वोलोदिमीर जेलेंस्की (Putin) यांची ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे.

मोदींची सोशल मीडिया पोस्ट

या चर्चेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स (माजी ट्विटर) अकाउंटवर लिहिले – माझे मित्र, अध्यक्ष पुतिन यांचे त्यांच्या फोन कॉलसाठी आणि अलास्कामध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती दिल्याबद्दल आभार. भारताने नेहमीच युक्रेन संघर्षाच्या शांततामय समाधानाचे आवाहन केले आहे. त्या दिशेने होणाऱ्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. आगामी काळात आमच्या सततच्या संवादाची मी अपेक्षा करतो.

संतोष देशमुख प्रकरणी मोठा ट्विस्ट! वाल्मिक कराडच्या जामिनावर कोर्टात जोरदार युक्तिवाद, 30 ऑगस्टला मोठा निर्णय?

भारताची भूमिका स्पष्ट

पंतप्रधान मोदी यांनी या संभाषणात भारताची ठाम भूमिका अधोरेखित केली. युक्रेन युद्धाचे शांततामय मार्गाने समाधान शोधले पाहिजे. शांतीसाठी जे काही प्रयत्न होतील, त्याला भारताचा पाठिंबा राहील.तसेच, दोन्ही नेत्यांनी परस्पर सहकार्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. पुढेही नियमित संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली.

विरोधी पक्षाचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरला! सी.पी. राधाकृष्णनांना टक्कर देणार ‘हा’ दिग्गज नेता

फोन इतका महत्वाचा का?

आज रात्री वॉशिंग्टनमध्ये युरोपीय नेता जेलेंस्की यांची ट्रम्प यांच्यासोबत भेट होणार आहे. रशिया आणि भारत यांच्यात दीर्घकाळापासून मजबूत मैत्री आणि व्यापारिक संबंध आहेत. पण अलीकडेच अमेरिकेने भारतावरील टॅरिफ (आयात शुल्क) मोठ्या प्रमाणावर वाढवले आहेत. विशेष म्हणजे जर युक्रेन युद्धातील तणाव कमी झाला आणि शांती प्रस्थापित झाली, तर भारतावरील हे टॅरिफ कमी होण्याची शक्यता आहे. युरोपीय नेत्यांच्या बैठकीनंतर जे निर्णय घेतले जातील, त्याचा परिणाम रशियासह भारतावरही होऊ शकतो.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube