मुंबईकरांचा आशीर्वाद ड्युप्लिकेट ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टॅण्डला मिळाला; भाजपचा ठाकरे बंधुंवर निशाणा

Mumbaikars’ blessings not given to the duplicate brand but to the stand of Hindutva; BJP targets Thackeray brothers on Best Credit Union Election : बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना मोठा विजय मिळाला आहे. या निकालातून स्पष्ट झाले की, मुंबईकरांचा आशीर्वाद ड्युप्लिकेट ब्रँडला नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या खऱ्या स्टॅण्डला आहे, असे भाजप प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
चक्रं फिरली, पुतिन यांचा ट्रम्प यांना फोन; युक्रेनचा उल्लेख करत दिली मोठी ऑफर
संजय राऊतांवर टीका
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उबाठाचा पूर्ण पराभव झाला. यावर संजय राऊत आधी “मुंबईत आमचाच ब्रॅंड चालणार”, अशी पोपटपंची करत होते. पण आता निकाल लागल्यानंतर त्यांची दातखिळी बसली आहे. नेहमीप्रमाणे “EVM, व्होट चोरी” असे खोटे आरोप करण्याचा मुद्दाही त्यांच्याकडे उरलेला नाही. बेस्टच्या निवडणुकीत मुंबईकरांनी थेट मतदानातून उबाठाचा धुव्वा उडवला आहे. यापुढे मुंबईत केवळ हिंदुत्वाचा ब्रँड विजयी होईल, ड्युप्लिकेट ब्रँड नाही हे या निकालातून अधोरेखित झाले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी; अजित पवारांची राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट!
बेस्ट पतपेढी निकालाचे राजकीय महत्त्व
बेस्ट पतपेढीची निवडणूक पक्षीय पातळीवर घेऊ नये, असं आमचं मत होतं. मात्र सहकारातून स्वाहाकार करणाऱ्यांनी ती निवडणूक राजकारणात ओढली. बेस्ट कर्मचाऱ्यांनी ठाकरे गटाला ठोसा मारून चपराक दिली आहे. महापालिकेत हिंदुत्वाचा स्टॅण्ड कायम राहील, हे बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदानातून दाखवून दिलं आहे. प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा विजय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे.
संसदेतील कायद्यावरील टीका
संसदेतील कायदे म्हणजे हुकूमशाही असल्याची टीका संजय राऊत करत आहेत. प्रत्यक्षात हे कायदे राजकारणातील पारदर्शकता आणि साधनसुचिता कायम राखण्यासाठी आहेत. मोदी सरकारच्या काळात मनमानी कारभार चालणार नाही. यामुळेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पदावर असताना जेलमध्ये गेलेले – संजय राऊत, अनिल देशमुख, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, हेमंत सोरेन – असे नेते घाबरून या कायद्यांना विरोध करत आहेत.
पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे कार्य
काल मुसळधार पावसामुळे काही भागात अडचणी निर्माण झाल्या. तरीही मेट्रो व्यवस्थित चालू राहिली. मोनो रेल्वे मध्ये थोडा अडथळा आला, पण कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यंत्रणा हलवली आणि प्रवाशांची सुटका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आलेल्या संकटाला परतवून लावलं. प्रशासन सक्षम हातात असेल तर संकटाला कसं तोंड देता येतं हे मुंबईकरांनी पाहिलं.