Jayant Patil : जयंत पाटील यांना डेंग्यू; थेट रिपोर्टच सोशल मीडियात टाकला

Jayant Patil : जयंत पाटील यांना डेंग्यू; थेट रिपोर्टच सोशल मीडियात टाकला

Jayant Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनाही डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील यांनीच स्वतः ट्विट करत आपल्या आजारपणाची माहिती दिली. यासोबत त्यांनी मेडिकल रिपोर्ट सुद्धा पोस्ट केला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनाही डेंग्यू झाला होता. तेव्हापासून ते फारसे कुठे दिसले नव्हते. दिवाळी सणानिमित्त मात्र शरद पवार, अजित पवार यांच्यासह सर्व कुटुंबीय एकत्र दिसले होते.

Jayant Patil : ‘मोदीजी, फित कापून खुशाल श्रेय घ्या! ‘निळवंडे’ची आठवण सांगत जयंत पाटलांचा टोला

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरुवात करेन. जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आली.

काही दिवसांपू्र्वी अजित पवार यांनाही डेंग्यूची लागण झाली होती. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच त्यांना डेंग्यू झाला होता. त्यामुळे या काळात अजित पवार फारसे कुठे दिसले नव्हते. त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला होता. आजारातून बरे झाल्यानंतर अजितदादांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. निधीवाटपावरून त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चाही रंगली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube