घरात जे ठरतं, ते बाहेर जाऊन सांगणं हे चांगल्या पोराचं लक्षण नसतं; जयंत पाटलांचा अजितदादांना टोला

Jayant Patil : शरद पवारांच्या (Sharad Pawar) आदेशाने राजीनामा परत घेण्याचं आंदोलन करण्यात आलं असल्याचं मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. दरम्यान, कर्जतमध्ये अजित पवार गटाचे विचारमंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर सडेतोड भाष्य केलं. त्याला आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी […]

Ajit Pawar Jayant Patil

ajit pawar jayant patil

Jayant Patil : शरद पवारांच्या (Sharad Pawar) आदेशाने राजीनामा परत घेण्याचं आंदोलन करण्यात आलं असल्याचं मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. दरम्यान, कर्जतमध्ये अजित पवार गटाचे विचारमंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर सडेतोड भाष्य केलं. त्याला आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं.

‘डॉक्टर हे देवाचं रुप..,; राष्ट्रपती Droupadi Murmu यांचं विधान 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चात बोलतांना जयंत पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका केला. अनेक जण खाजगी चर्चा चव्हाट्यावर मांडायला लागले. घरातल्या चर्चा चव्हाट्यावर मांडण्याची परिस्थिती येणं बरी नसतं. घरात जे ठरतं, ते बाहेर जाऊन सांगणं हे चांगल्या पोराचं लक्षण नसल्याची टीका त्यांनी केली.

पाटील म्हणाले, घरातील बाबी बाहेर मांडण्याची गोष्टी पोरांनी करू नये. सतत त्याच त्याच गोष्टी महाराष्ट्रासमोर का सांगताय? महाराष्ट्रातल्या जनतेला काय बघायचं, तर शरद पवार काय करतात… शरद पवार काय दिशा देतात हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचं आहे. पवारांनी जी दिशा दिली, ती जनतेला मान्य असतांना तुम्ही जुन्याच चर्चा करून आमच्या नेतृत्वाची प्रतिमा मलिन करण्याची प्रतिमा का करताय, असा सवाल त्यांनी केला.

Uddhav Thackeray : कृषिमंत्र्यांनी कुठल्या तरी एका घरात बसून कामं करावीत, उद्धव ठाकरेंनी धनंजय मुंडेंना डिवचलं… 

अजित पवारांची टीका काय ?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात तीव्र संघर्ष सुरू झाला आहे. पक्ष कोणाचा आहे, यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. अशातच आज अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘सरकारसोबत जा, मी राजीनामा देत आहे,’ असे शरद पवार म्हणाले होते, असा खुलासा त्यांनी केला.

ते म्हणाले, शरद पवार राजीनामा देतील हे कोणालाच माहीत नव्हते. घरातील फक्त चार जणांना माहीत होते. यानंतर त्यांनी राजीनामा दिला. 15 सदस्यांची समिती स्थापन केली. समितीने बसून अध्यक्ष निवडावा, असं सांगितलं. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यातून वातावरण वेगळं झालं. यानंतर शरद पवार घरी गेले. राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना बोलावून आंदोलन करण्यास सांगण्यात आले. राजीनामा परत घ्या, परत घ्या, असं सुरू झालं, अशी टीका त्यांनी केली.

Exit mobile version