Download App

तुलना कुणाशी करायची याचं भान ठेवा, अजित पवारांना जयंत पाटलांचा टोला

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही, या उपमुख्यमंत्री अजित पवा (Ajit Pawar) यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी समाचार घेतला. सत्तेशिवाय विकास होत नाही या अजित पवारांच्या (Ajit Pawar) विधानाशी मी सहमत आहे. मात्र विकासाला तत्त्वाची झालर व धोरण असलं पाहिजे, असं ते म्हणाले. आली कार्यशैली पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्यासारखी असल्याचे अजित पवार म्हणाले होते. त्यावरूनही जयंत पाटलांनी अजित पवारांना टोला लगावला.

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी केतकी चितळेसह कार्यक्रमाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल 

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक खुले पत्र प्रसिद्ध करून शरद पवार यांच्यापासून फारकत घेऊन भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? याचं स्पष्टीकरण दिलं होतं. या पत्रात त्यांनी आपली कार्यशैली पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्यासारखी असल्याचे म्हटले होतं. यावरून आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला. इकडं असतांना काहीही चालत होतं, तिकडे असे चालत नाही, तुलना करतांना भान ठेवा, असा सल्ला पाटील यांनी दिला.

Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील ‘या’ ठिकाणी होणार नवे 3 उड्डाण पुल… 

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान जयंत पाटील म्हणाले, अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते. सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही, असे ते म्हणाले. हे खरंय, सत्ता असल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. पण विकासाल तत्त्वांची झालर असली पाहिजे. विकासाला काहीतरी धोरण असावं. पण त्या पत्रात ते म्हणाले की, माझी कार्यशैली नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारखी आहे. आमचे त्याबाबत दुमत नाही. पण इतरांना (भाजप) आक्षेप असू शकतात. आपली तुलना कोणाशी करायची? याचं भान तिकडं गेल्यावर ठेवण्याची गरज आहे, असं टोला पाटील यांनी लगावला.

पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील जनता कर्तबगार आहे, ही अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन इतकी होणारच आहे. याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरच आमची तक्रार आहे. पण आपल्या राज्याचा विकास दर 6.7 ते 7 टक्के आहे. एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर हे विकासदर 14 ते 15 टक्क्यांपर्यंत न्यायला हवा. हा विकास दर 15 टक्क्यांपर्यंत कसा नेला जाईल, याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी करावा, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.

अजित पवार पत्रात काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेला विकास मला महत्त्वाचा वाटला, मला त्यांचे कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णयप्रक्रिया हे गुण भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती जुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणे शक्य होईल, असं मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेलता, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती.

 

follow us