Jayant Patil on Sunil Tatkare : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मुरुडमध्ये शेकापची निर्धार मेळावा झाला. या सभेत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या दुसऱ्या पत्नी असल्याचं वादग्रस्त विधान पाटील यांनी केलं आहे.
Lok Sabha Election : आता माघार नाही! ‘त्या’ जागांसाठी काँग्रेस मित्रपक्षांना देणार टक्कर?
अजित पवारांनी बंडखोरी करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला सुमारे 40 आमदारांनी पाठिंबा दिला. तसेच पक्षाचे दिग्गज नेते सुनील तटकरेंनीही अजित पवारांना पाठिंबा दिला. तटकरे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. यावरूनच जयंत पाटील यांनी तटकरेंवर खोचक टीका केली. कोकण शिक्षण मतदारसंघात शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांच्या झालेल्या पराभवाचे विवेचन करत पाटील यांनी तटकरेंना खडे बोल सुनावले.
Lok Sabha Election : आता माघार नाही! ‘त्या’ जागांसाठी काँग्रेस मित्रपक्षांना देणार टक्कर?
ते म्हणाले, मी बाळराम साहेंबांना बोललो की, नको उभा राहूस. विधानससभेला उभं राहा. पण, ऐकलं नाही. त्याचा विश्वास. नुसती तुमची चार संस्थाची कामं मिळाली असती. स्वामी गेली, रयत गेली. दादांची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे. ही जी परिस्थिती आहे, ती आम्ही कधी विसरणार नाही, असं पाटील म्हणाले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांनी त्यांना मोठं केलं. मात्र सुनील तटकरे यांनी त्यांच्याच पाठीत वार केला. आता सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीला उभे राहणार नाहीत, अशी स्थिती करायची आहे. अपमानाचा बदला घ्यायचा आहे, असा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर आता अजित पवार गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं,हेच पाहणं महत्वाचं आहे.