पवारांच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रय़त्न, रोहित पवारांनी सांगितला प्लॅन

Pawar's NCP अजित पवारांच्या पक्षात कुटुंब आणि मर्जीतल्यांना संधी दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

Complete loan waiver for farmers and businessmen is needed; Sharad Pawar's 'these' five suggestions to the government

Pawar’s NCP attempt to project distinct image from Ajit Pawars Rohit Pawar outlines plan : गेल्या काही दिवसांत विविध पदे आणि उमेदवारी वाटपांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात कुटुंबातील आणि मर्जीतील व्यक्तींना संधी दिली गेल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता वेगळी भूमिका घेतली आहे. आज झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. येत्या पंधरा दिवसांत पक्षात फेरबदल केले जाणार असून ज्यांचे कोणा नेत्याशी नाते, घराणेशाहीशी संबंध नाही, अशा सामान्य पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार म्हणाले आहेत.

मोदींना पंतप्रधानपदी 12 वर्षे पूर्ण! जॉर्जिया मेलोनींपासून श्रीलंकेच्या राष्ट्रपतींपर्यंत जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम झाला. यामध्ये बोलताना रोहित पवार यांनी ही माहिती दिली आहे. पवार म्हणाले, पुढील दहा पंधरा दिवसात पक्षात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात येणार आहेत. ज्यांचे कोणाही नेत्याशी नाते नाही, ज्यांचा घराणेशाहीशी संबंध नाही, अशा कार्यकर्त्यांना पक्षाची पदे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते, युवक आणि महिलांना पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. पक्ष मजबुत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनातील ‘हिरोगिरी’वर झगडे यांची नाराजी? सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर्कवितर्कांना उधाण

पक्षात बदल करण्याच्या घोषणा शक्यतो स्वतः शरद पवार करीत असतात. यावेळी पवार किंवा कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आमदार रोहित पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनाही पक्षात मोठी संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

follow us

संबंधित बातम्या