Download App

…तर तुमचा पी. चिदंबरम होईल, जयंत पाटलांचा हसतहसत पण गंभीर इशारा

जनसुरक्षा विधेयकाचा गैरवापर होण्याची भीती आहे, तुम्ही विधेयक पास करताय, पण तुम्ही गृहमंत्री नसाल तर तुमचाही पी. चिदंबरम होईल.

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बहुचर्चित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेच्या पटलावर सादर केले. विरोधकानी हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी आणल्याचा आरोप केलाय. तर सरकारने हे विधेयक देशविरोधी कृत्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना आळा घालण्यासाठी असल्याचा दावा केलाय. दरम्यान, यावरूनच शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे.

चीननंतर तुर्कीशी बांगलादेशची मैत्री; संरक्षण करार भारतासाठी डोकेदुखी! 

जनसुरक्षा विधेयकाचा गैरवापर होण्याची भीती आहे, तुम्ही विधेयक पास करताय, पण तुम्ही गृहमंत्री नसाल तर तुमचाही पी. चिदंबरम होईल, असा पाटील यांना हसत-हसत इशारा दिलायं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले 2024 चे जनसुरक्षा विधेयक समंत करावे, असा प्रस्ताव मी मांडतोय. आम्ही डिसेंबरच्या अधिवेशनात हे विधेयक सभागृहात मांडले होते. त्यानंतर, सदस्यांनी त्यावर सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. म्हणून आम्ही हे विधेयक संयुक्त वैद्यकीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. विधेयकाचा कोणताही दुरुपयोग होणार नाही. त्यामुळं हे विधेयक एकमताने मंजूर करावं, असं आवाहन फडणवीसांनी केलं.

बनावट जीआरने साडेपाच कोटींचे कामे लाटली; अधिकाऱ्यांना जाग आल्यावर ठेकेदार गुन्ह्यात अडकला 

त्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, या विधेयकावर चर्चा करण्यासाठी जी समिती नेमली त्यात मी, जिंद्रेत आव्हाड, नाना पटोले होतो. बावनकुळेंनी आम्हाला विश्वास घेऊन काम केलं. कायद्यात काही बदल करण्याच्या सूचनाही आम्ही केल्या. पण, शेवटच्या मिटींगला आम्ही उपस्थित राहू शकलो नाही. नक्षलवादी चळवळ मोडून काढली पाहिजे. नक्षलवादी चळवळीच्या विरोधातच आम्ही आहोत. पण, आज नक्षलवादाचे शहरीकरण झाल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं या कायद्याचा गैरवापर होण्याची भीती इतरांना आहे. आपण गृहमंत्री असाल तोपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही गृहमंत्री नसला तर तुमचाही पी. चिदंबरम होऊ शकतो. चिंदबरम यांनी पीएमएलए कायदा केला आणि पहिले बळी तेच गेले होते, असं पाटील म्हणाले.

follow us