Download App

जयंत पाटलांचा शरद पवारांनी बळी घेतला, सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप

Sadabhau Khot On Sharad Pawar : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का

  • Written By: Last Updated:

Sadabhau Khot On Sharad Pawar : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का देत 11 पैकी 09 जागांवर विजय मिळवला आहे. तर फक्त 2 जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातात आहे.

तर दुसरीकडे जर महाविकास आघाडीचे मतं फुटले नसते तर या निवडणुकीत महायुतीला विजय मिळवता आला नसता आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला नसता अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. यातच जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पराभवानंतर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केला आहे.

माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की,  शरद पवार महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आहे. ते म्हणतात मी महाराष्ट्रचं सत्ता परिवर्तन करू शकतो, कोणाचीही सत्ता आणू शकतो आणि कोणाची सत्ता घालवू शकतो. राज्यात जेव्हा भाजप आणि शिवसेनाची सरकार होती तेव्हा शरद पवार यांनी फोडाफोडी केली. जर स्वतः कडे सत्ता येत असेल तर वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. असं ते म्हणाले.

तसेच पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यात शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचं काम शरद पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री करताना ठाकरे तुमचं ऐकतात. भाजपची साथ सोडताना ठाकरे तुमचं ऐकतात, मग जयंत पाटलांच्या उमेदवारीसाठी त्यांनी तुमचं का ऐकलं नाही? हा डाव पवारांनी टाकलेला आहे आणि त्यामध्ये जयंत पाटील यांचा बळी गेला असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, गावगाड्याच्या चर्चा नेहमी होत असतात, फाटक्या माणसांच्या चर्चा होतात मात्र वाड्यातील माणसांच्या चर्चा होत नाहीत कारण ते जन्माला येतानाच  ताम्रपट घेऊन आलेले असतात त्यामुळे कोणतीही सिहांसन हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो. परंतु भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगतिले की, प्रस्थापितांचा सिंहासनावर हक्क नाही, कष्ट करणाऱ्या जनतेचा सिंहासनावर हक्क आहे. मला वाटतंय प्रस्थापितांचे मनसुबे धुळीला मिळाले आहे. त्यांचे वाडे उद्ध्वस्थ झालेत. हे कालच्या निकालावरुन स्पष्ट झालं असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

शेतकऱ्यांचे शिवार हिरवेगार होऊ दे

तसेच शेतकऱ्यांचे शिवार हिरवेगार होऊ दे. त्याच्या खळ्यावरती धन धान्याची रास लागू दे. धान्याला भाव मिळू दे, अशी मागणी मी बाप्पांच्या चरणी केली असं देखील खोत म्हणाले.

Dhruv Rathee च्या अडचणी वाढल्या, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या मुलीबाबत ‘ते’ ट्विट नडले

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासारख्या फाटक्या माणसाला महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात काम करण्याची संधी दिली. देवेंद्रजींना बाप्पाने उदंड आयुष्य द्यावे, असं साकडं देखील  सदाभाऊ खोत यांनी घातलं आहे.

follow us