Jayant Patil : राज्यात ईडीच्या छाप्यांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईडीने राज्यात 14 ठिकाणी छापे टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये महत्त्वाचे म्हणजे राजारामबापू सहकारी बॅंकेच्या कार्यालायावर देखील छापा टाकण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ही बॅंक त्यांच्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. (Jayant Patil will problem ED raid on Rajarambapu sahkari bank )
मोदींनी बाळासाहेबांचं स्वप्न साकारलं, पण ठाकरे 370 कलमची मागणी करणा-यांच्या बाजूला जावून बसले
ईडीला संशय आहे की, या बॅंकेने बनावटा कागदपत्रांच्या आधारे बॅंकेत खाती उघडून मोठ्याप्रमाणात रक्कमा वळत्या केल्या आहे. यामध्ये बॅंक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी ईडीकडून या बॅंकेच्या 10 वर्ष जुन्या 1 हजार कोटी रूपायांच्या व्यवहारांची तपसणी केली जाणार आहे.
मात्र यावर अद्याप जयंत पाटील यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे ते यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ईडीने सांगलीमध्ये एकाचवेळी पाच व्यापाऱ्यांवर छापे टाकले आहेत. आर्थिक अनियमिततेच्या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. रात्री अडीच वाजता ही चौकशी आटोपून ईडीचे अधिकारी मुंबईला परतले. यामध्ये ईडीने या व्यापाऱ्यांच्या बॅंकेत जाऊन देखील चौकशी केली.
यामध्ये सांगली शहरातील इलेक्ट्रीक साहित्याची विक्री करणाऱ्या दिनेशव सुरेश पारेख आणि अविंद व ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. तसेच पिंटू बियाणी यांच्यावर देखील ईडीने छापा टाकला आहे. त्यातच राजारामबापू सहकारी बॅंकेच्या कार्यालायावर देखील छापा टाकण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.