Monsoon Update : बळीराजा सुखावला, राज्यात विविध ठिकाणी सरी बरसल्या; समाधानकारक पावसाची प्रतिक्षा कायम
Maharashtra Rain : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र शुक्रवारी 23 जूनला हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र अद्याप देखील अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. (Maharashtra Rain News Rain fall in various areas of state )
तेलंगाणाचं अख्ख मंत्रिमंडळ 27 तारखेला पंढरपुरात येणार; बीआरएसचे मिशन महाराष्ट्र
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अद्याप देखील शेतीतील पेरण्यांसाठी समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी खरीप पेरणी पूर्व मशागत करून पावसाची वाट पाहत आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र’ योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड…
त्यामध्ये आता मुंबई परिसरात, विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, तर कोकणातील रत्नागिरीमध्ये चिपळूण, खेड, गुहागर, दापोली मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. तर आता शेतीच्या मशागतींना लवकरच सुरूवात होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर तिकडे आषाढीवारीच्या आधीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी, 23 जूनला राज्यातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पाऊस बरसला. तर यावेळी तर 24 आणि 25 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.