बीआरएसचे मिशन महाराष्ट्र; तेलंगाणाच्या मंत्र्यांची फौज 27 तारखेला पंढरपुरात दाखल होणार

बीआरएसचे मिशन महाराष्ट्र; तेलंगाणाच्या मंत्र्यांची फौज 27 तारखेला पंढरपुरात दाखल होणार

K chandrashekhar Rao in Pandharpur : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. त्यात आता यावर्षीच्या आषाढी वारीला राजकीय रंग चढणार आहे. कारण महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरसावलेले बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत. ( K chandrashekhar Rao in Pandharpur with his cabinet)

‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र’ योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड…

सध्या के चंद्रशेखर राव राज्यात आपल्या पक्षाची पायमुळ घट्ट करण्यासाठी झपाट्याने सभा आणि पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे आपल्या अब की बार किसान सरकार या घोषणे प्रमाणे थेट विठूरायाच्या पंढरीमध्ये जात वारकऱ्यांना भेटणार आहेत. 27 जूनला के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत. तर आषाढीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 28 जूनला पंढरपूरला जाणार आहेत.

औद्योगिक क्षेत्रावरुन शिंदे-पवारांची जुंपली, पवारांकडून शिंदेंचा ‘अदृश्य शक्ती’ असा उल्लेख…

यावेळी त्यांच्यासोबत तेलंगाणाचं अख्ख मंत्रिमंडळ पंढरपुरात येणार येणार आहे. त्यामुळे त्यांचं मिशन महाराष्ट्र जोरात सुरू असल्याचं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. यावेळी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांचे सहकारी विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. तसेच ते त्यानंतर तुळजाभवानीचंही दर्शन घेणार आहेत. तेथे देखील त्यांचे सहकारी असणार आहेत. अशी माहिती बीआरएसचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली. यावेळी के चंद्रशेखर राव वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीआरएसकडून पुण्यापासूनचे सर्व पालखी मार्ग आणि पंढरपूरमध्ये होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

दरम्यान ज्यांची ताकद नाही ते लोकं देशावर कधीच राज्य करु शकत नाही, या शब्दांत कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना चिमटा काढला आहे. दरम्यान, यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याला के. चंद्रशेखर राव हजेरी लावणार आहेत. यावेळी वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर शिंदे यांनी भाष्य केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube